शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

आकेशियाची ‘ती’ झाडे देतात मृत्यूला आमंत्रण

By admin | Updated: August 3, 2014 22:44 IST

बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा : राजापूर तालुक्याचा पूर्व विभाग बनतोय धोकादायक

पाचल : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळेच रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली झाडे आजघडीला प्रवाशांसह वाहनांच्या दुर्घटनेला कारणीभूत ठरत आहेत. चुकीच्या पद्धतीचा वापर करुन केवळ सरकारी पैसा लाटण्याचा प्रकार सध्या बांधकाम खात्यात सुरु झाल्याने खात्याबाबत संताप व्यक्त होत आहे.बांधकाम खात्याच्या राजापूर उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा लावलेली आकेशियाची झाडे आज प्रवाशांना सावलीपेक्षा मृत्यूला आमंत्रण देणारी ठरत आहेत. रस्त्यावरुन वाहतूक करणे किंवा पायी प्रवास करताना रस्त्यावरील डांबरामुळे उष्णतेमुळे डोळ्यांची आग होऊन त्रासाचा प्रवास होवू नये, म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने वनिकरणाच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली आहेत. अशाच रस्त्यापैकी ओणी अणुस्कुरा विठापेठ राज्यमार्ग १५० वर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आहेत. हा रस्ता राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील गावाच्या जवळून जातो. मात्र, कोल्हापूर बाजारपेठेशी सर्वांत जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर सतत वर्दळ असते. अशा अतिशय महत्त्वाच्या रस्त्यावर प्रवाशांच्या सावलीसाठी उष्णतेला रोधक बनवण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यानजीक लावलेली आकेशियाची झाडे याच प्रवाशांच्या मृत्यूला आमंत्रण देणारी ठरत आहेत.उन्हाळ्यात सावली मिळणाऱ्या झाडाचा विस्तार किती झाला आहे. ही झाडे रस्त्यावर किती प्रमाणात झुकली आहेत, याचा सार्वजनिक बांधकाम खात्याने कधीच विचार केलेला नाही.मुळात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली आकेशियाची झाडे ही विदेशी जात असून, सदाहरीत आहेत. याची पाळे खूप खोल जात नाहीत. त्यामुळे या झाडाचे खोड विस्ताराचा भार सहन करु शकत नाहीत. अशा प्रकारे लावण्यात आलेली ही झाडे रस्त्याच्या बाजूकडे झुकल्याने ती कधीही रस्त्यावर कोसळतात. अशा कोसळणाऱ्या झाडामुळे अनेक अपघात होऊनसुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आलेली नाही.या ओणी-अणुस्कुरा विठापेठ रस्त्यावर २२.५०० अंतरावर उचावळे वळणात एका दरडीवर असलेल्या झाडाचा भरमसाठ विस्तार झाला आहे. मात्र, हे झाड पूर्ण रस्त्याच्या बाजूला झुकले आहे. त्यामुळे हलक्या वाऱ्यातसुद्धा हे झाड रस्त्यावर कधीही कोसळू शकते. ज्या ठिकाणी हे झाड आहे तिथे वळण असल्याने समोरुन येणारे वाहन एकमेकांना दिसून येत नाही. संभाव्य अपघात टाळण्यासाठी बांधकाम खात्याने योग्य ती खबरदारी घ्यावी. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी साफसफाई करताना कर्मचाऱ्यांना ही झुकलेली अपघाताला कारणीभूत ठरणारी झाडे दिसून येत नाहीत याबाबत आश्चर्य आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी ही वस्तुस्थिती दिसून येत आहे. अनावश्यक ठिकाणी झाडे लावल्याने त्याचा वाहनचालकांना त्रास होत असून ती हटवण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)