शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिओ मोहिमेच्या दिवशी गाड्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 14:18 IST

vaccine Ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड योध्दे म्हणून काम करणाऱ्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांवरील कंत्राटी वाहनचालकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे हे वाहन चालक पोलिओच्या कामावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.

ठळक मुद्देपोलिओ मोहिमेच्या दिवशी गाड्या बंद कंत्राटी वाहनचालकांचे दोन महिन्यांचे मानधन रखडल्याने निर्णय

रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड योध्दे म्हणून काम करणाऱ्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांवरील कंत्राटी वाहनचालकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे हे वाहन चालक पोलिओच्या कामावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कंत्राटी वाहनचालक १०२ रुग्णवाहिकांमधून कोरोनाबाधित रुग्णांसह इतर रुग्णांसाठी २४ तास सेवा बजावत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना दाखल करण्यासाठीही या रुग्णवाहिकांचा वापर करण्यात येतो.

हे कंत्राटी वाहनचालक ११,६०० रुपये मानधनावर काम करतात. प्रत्यक्षात त्यांना हातात ८,६०० रुपये मानधन दिले जाते. या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे केली आहे.या मागणीची दखल आरोग्य विभागाने घेतली असून, लवकरच नवीन कंत्राट वाढीव मानधनाचे असणार असल्याचे समजते. चालकांना गणेशोत्सवातही मानधन मिळाले नव्हते. दरम्यान, कोरोना काळात काम करत असताना त्यांना वेळेवर वेतन मिळणे आवश्यक आहे. मात्र, नोव्हेंबर, डिसेंबर, २०२०चे मानधन अजूनही त्यांना मिळालेले नाही. १७ जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे. त्यावेळी मानधन न मिळाल्यास गाड्या बंद ठेवून काम बंद आंदोलनाचा इशारा या चालकांनी दिला आहे.कोरोनाची लागणकोरोना महामारीमध्ये काम करत असतानाच कोरोना रुग्णाशी थेट संपर्क आल्याने त्यांच्यापैकी ५ कंत्राटी वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली होती. तरीही या चालकांनी रुग्णसेवा सुरूच ठेवली होती. अतिजोखमीच्या कामातही सेवा बजावणाऱ्या या वाहनचालकांना वेतनासाठी धडपडावे लागत आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसRatnagiriरत्नागिरी