शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी स्थानकावर संतप्त प्रवाशांचा रेलरोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 04:01 IST

दादर - मडगाव पॅसेंजर रविवारी मध्यरात्री १.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकात आल्यानंतर पुढे न गेल्याने संतप्त प्रवाशांनी रविवारी ४ ते ६ आकस्मिक रेलरोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना समजावत ओखा व कोकणकन्या एक्सप्रेसने त्यांना मडगावला पाठविले.

रत्नागिरी  -  दादर - मडगाव पॅसेंजर रविवारी मध्यरात्री १.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकात आल्यानंतर पुढे न गेल्याने संतप्त प्रवाशांनी रविवारी ४ ते ६ आकस्मिक रेलरोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना समजावत ओखा व कोकणकन्या एक्सप्रेसने त्यांना मडगावला पाठविले. ४ मे पासून रत्नागिरी ते मडगाव व मडगाव ते रत्नागिरी अशी या गाडीची फेरी बंद करण्यात आली आहे. त्याची माहिती कोकण रेल्वेच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. परंतु ही माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचलेली नसल्याने गोंधळ उडाला.संतापाचा बांध फुटला रत्नागिरी पॅसेंजर पहाटे ४ वाजताच्या सुमारास मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज झाली. त्यामुळे रात्रभर स्थानकावर ताटकळलेल्या प्रवाशांच्या संतापाचा बांध फुटला. पहाटे ४ वा. सुमारे ३०० ते ४०० पुरुष प्रवासी रेल्वे रुळावर उतरले. पूर्ण ट्रॅक अडविण्यात आला. अचानकपणे रेल्वे प्रवाशांनी केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनही अडचणीत आले. रेल्वे पोलीस व रत्नागिरी पोलिसांना स्थिती हाताळण्यासाठी पाचारण करण्यात आले.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी