रत्नागिरी : दरवर्षी वेगळे विषय घेऊन आकर्षक दीपोत्सव वाचकांसमोर ठेवण्याची ‘लोकमत’ची प्रथा आहे. यंदाचे विषय पाहता ही प्रथा यंदाही तेवढ्याच दर्जेदारपणे कायम ठेवण्यात आली आहे, असे कौतुकोद्गार रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयाचे अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अॅड. दीपक पटवर्धन यांनी काढले.‘लोकमत दीपोत्सव’चे गुरुवारी अॅड. पटवर्धन यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सॅमसंग कंपनीचे रत्नागिरीतील एकमेव ब्रॅण्ड शॉपचे मालक प्रल्हाद लिमये तसेच रोटरी क्लब आॅफ रत्नागिरीचे अध्यक्ष सचिन मुकादम उपस्थित होते.‘लोकमत’च्यावतीने मनोज मुळ्ये यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि दीपोत्सवबाबत माहिती दिली. सचिन मुकादम आणि प्रल्हाद लिमये यांनी नियमित दैनिक उत्कृष्ट देतानाच ‘लोकमत’ने ‘दीपोत्सव’सारखी दिवाळी भेट वाचकांना दिली‘लोकमत’च्या प्रगतीचे कौतुक करून ‘दीपोत्सव’ला शुभेच्छा दिल्या. असल्याचे या वक्त्यांनी सांगितले.अॅड. पटवर्धन यांनी ‘लोकमत’च्या टीमचे आवर्जून कौतुक केले. दिवाळी अंकासाठी पारंपरिक पठडीचे विषय न घेता समाजात आज घडणाऱ्या विविध घटना लोकांसमोर आणण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले असल्याचे त्यांनी सांगितले. अतुल कामत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
दर्जेदार ‘दीपोत्सवा’ची प्रथा कायम : पटवर्धन
By admin | Updated: November 5, 2015 23:57 IST