शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

देवरूख नगरपंचायतीने केलेल्या अतिक्रमण कारवाई विरोधात व्यापारी आक्रमक, नगरपंचायतीवर व्यापाऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 17:27 IST

देवरूख नगरपंचायतीने केलेल्या अतिक्रमण कारवाई विरोधात व्यापारी वर्गात संतापाची लाट

देवरूख : देवरूख नगरपंचायतीने काल, बुधवारी अतिक्रमण हटाव मोहिम राबविली होती. त्याचे पडसाद आज, गुरूवारी उमटले. शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या कारवाईचा निषेध करत जाब विचारण्यासाठी नगर पंचायतवर धडक दिली.नगर पंचायतच्यावतीने अतिक्रम हटाव मोहिम राबविताना चार दिवस आधी माहिती देणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्यानेच व्यापारी वर्गात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली. याबाबत जाब विचारून आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत थेट नगर पंचायत वर मोर्चा काढला.अतिक्रमणामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी होते तर मग पार्किंगचा प्रश्न देखील नगर पंचायत प्रशासनाने सोडविणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही वर्षा पासून पार्किंगचा प्रश्न देखील तसाच आहे. नागरिकांना सुविधा उपलब्ध नकरताच थेट कारवाईची मोहीम का असा सवाल व्यापाऱ्यांनी यावेळी केला.नगरपंचायत प्रशासना सोबत चर्चा करण्यासाठी व्यापारी वर्गाने धडक दिली होती. मात्र मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी भ्रमणध्वनी व्दारे त्यांच्याशी संपर्क केला. अतिरिक्त कार्यभार असल्याने मुख्याधिकारी मंगळवारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी मंगळवारी चर्चा झाल्यानंतरच कारवाई बाबतचा निर्णय घेतला जावा अशी भूमिका देखील व्यापारी वर्गाने मांडली.दरम्यान, काल बुधवारी केलेली कारवाई हि सरसकट करण्यात आली असून यात  काही व्यापाऱ्यांना नाहक त्रास देण्यात आला आहे, असा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आता यावर काय तोडगा निघणार आणि नगर पंचायत कोणती भूमिका घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी