शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

रत्नागिरीच्या मत्स्यजगाकडे पर्यटकांचा ओढा

By admin | Updated: June 5, 2016 00:20 IST

मत्स्यालयात मांदियाळी : दोन महिन्यात तब्बल २९ हजार मत्स्यप्रेमींची भेट

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या शहरातील झाडगाव येथील सागरी संशोधन केंद्राच्या प्रेक्षणीय अशा मत्स्यालयाला गेल्या दोन महिन्यात २९,१६३ मत्स्यप्रेमींनी भेट दिली असून, गेल्या दीड वर्षात राज्यातील तसेच परदेशातील ३ लाख २९ हजार ३५१ पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यात १ लाख ५८ हजार ६६३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चित्ताकर्षक अशा या मत्स्यालयात गोड्या पाण्यातील मासे, सिक्लीड मासे, प्लांटेड (पाण वनस्पती), तसेच सागरी माशांची सुंदर मांडणी व सजावट करण्यात आली आहे. मत्स्यालयासाठी आधुनिक फिल्ट्रेशन व प्रकाश योजनेचा उपयोग करण्यात आला आहे. या मत्स्यालयात गोड्या तसेच सागरी पाण्यातील जवळपास ९० प्रजाती ठेवण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने गोड्या पाण्यातील अरोवाना, हम्पी हेड फ्लॉवर हॉर्न फिश, डिस्कस मासे तर खाऱ्या म्हणजेच सागरी पाण्यातील लायन फिश, बटरफ्लाय माशांच्या विविध प्रजाती, निमो मासे तसेच डॅमसेल माशांच्या विविध प्रजाती असे नानाविध आकर्षक मासे पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहेत. प्लांटेड अ‍ॅक्वेरिअम शौकिनांकरिता विविध २० प्रकारच्या पाण वनस्पतींनी व आधुनिक तंत्रज्ञानाने हे मत्स्यालय सजले आहे. नवीन रुप घेतलेले हे मत्स्यालय पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक भेट देताहेत. सध्या पर्यटनाचा हंगाम असल्याने मत्स्यालय हाऊसफुल्ल होत आहे. या मत्स्य संग्रहालयामध्ये विविध २५४ प्रजातींचे समुद्री जलचर रसायनामध्ये जतन करून ठेवण्यात आले आहेत. शंख, शिंपल्यांच्या विविध प्रजातीही येथे मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये डॉल्फीन मासा, ४० फुटी लांबीच्या महाकाय देवमाशाचा सांगाडा तसेच ५० वर्षापेक्षाही जास्त काळ जतन केलेले जिवंत कासव हे विशेष लक्ष वेधून घेतात. पूर्वी हे मत्स्यालय पेठकिल्ला येथील जुन्या इमारतीत होते. डिसेंबर २०१४ मध्ये ते नव्या जागेत आणण्यात आले आहे. या दीड वर्षांच्या कालावधीत १ लाख ७० हजार ६८० पर्यटकांनी या मत्स्यालयाला भेट दिली आहे. साधारणत : एप्रिल, मे या उन्हाळी सुटीच्या कालावधीत २९,१६३ पर्यटकांनी येथे मत्स्य दर्शनाचा लाभ घेतला आहे. आत्तापर्यंत एकूण ३ लाख २९ हजार ३५१ मत्स्यप्रेमींनी या मत्स्यालयाला भेट दिली आहे. (प्रतिनिधी)