शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांचे पर्यटकांना महत्वाचे आवाहन, म्हणाले..

By शोभना कांबळे | Updated: July 3, 2023 19:01 IST

रत्नागिरी : पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांनी तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या परिजणांची काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही ...

रत्नागिरी : पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांनी तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या परिजणांची काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही ठिकाणी नियम व शांततेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिक व परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा व त्याठिकाणी असणारी पर्यटन स्थळे, अनेक धबधबे, पाण्याचे डोह, घाट व घाटांमध्ये असणारे अनेक सनसेट पॉईंट्स वर भेट देण्यासाठी अनेक पर्यटक व नागरिक जिल्ह्यात येतात. सध्या, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे व वादळी वाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. परिणामी घाटामधील धुक्याच्या प्रमाणात ही वाढ झाली आहे. तसेच काही दरड प्रवण क्षेत्रांमध्ये, दरड कोसळण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झालेली आहे. परिणामी वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे, असे पाेलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी म्हटले आहे.घाटांमधून प्रवास करणाऱ्या अथवा निसर्गप्रेमी लोकांनी घाट माथ्यावर, अवजड वळणावर, सनसेट पॉईंट्स वर आपली वाहने उभी करून सेल्फी काढण्याकरिता थांबू नये. तसेच धुक्यामुळे होणारे अपघात टाळण्याकरिता आपल्या वाहनाचे फॉग लॅम्पचा व परावर्तकांचा योग्य वापर करावा. अतिवृष्टीमुळे घाटामधील असणारी जुनी व मोठी झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाणही जास्त आहे. धाेकादायक झाडाखाली आपली वाहने उभी करु नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

धबधब्यावर जाऊ नयेरत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या अनेक धबधब्यांमध्ये छोटे-मोठे दगड वाहून येत आहेत. तसेच धबधब्यांचा प्रवाहही जास्त प्रमाणांमध्ये आहे. त्यामुळे धबधब्यात उतरणारे लोक वाहून अथवा गंभीर इजा पोहाेचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी तेथे जाणे टाळावे.

माेह टाळापावसाच्या पाण्याने तयार झालेल्या डोहामध्ये खोलीचा अंदाज येत नाही. अशा ठिकाणी आपण तसेच लहान मुलांना घेऊन जाणे टाळावे. अतिवृष्टीमुळे समुद्रामध्ये, धरण, पाणलोट क्षेत्र, नदी व नाल्यांमध्ये (पऱ्यांमध्ये) पोहण्याचा व तेथे भेट देण्याचा मोह टाळावा व सुरक्षितता बाळगावी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिसtourismपर्यटन