शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सलग सुट्ट्यांमुळे गणपतीपुळे किनारा पर्यटकांनी गजबजला, वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:32 IST

निवासासाठी पर्यटक न थांबल्याने व्यावसायिक धास्तावले

गणपतीपुळे : श्रीक्षेत्र गणपतीपुळे (ता.रत्नागिरी) सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी गजबजून गेले आहे. शनिवार, रविवार आणि साेमवार अशा सलग सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेचा परिसर फुलून गेला आहे. मात्र, पर्यटक या ठिकाणी थांबत नसल्याने स्थानिक व्यावसायिक धास्तावले आहेत. वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी गणपतीपुळे क्षेत्राला पसंती दिली आहे. शनिवारपासून पर्यटकांची पावले गणपतीपुळेकडे वळली असून, साेमवारपर्यंत पर्यटकांची गर्दी कायम हाेती. त्यामुळे गणपतीपुळेचा समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला हाेता. गणपतीपुळेतील खानावळींमध्ये जेवणासाठी रांगा लागत आहेत, तसेच परिसरातील सर्वच लॉजमध्ये गर्दी पाहायला दिसत आहे.मात्र, या ठिकाणी आलेला पर्यटक येथे न थांबता तारकर्ली, गुहागर या ठिकाणी जाण्यास पसंती देत आहे. साेमवारी अनेकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेऊन समुद्रकिनाऱ्यावर माैजमजेचा आनंद लुटला. त्यानंतर, गुहागर, श्रीवर्धन, तारकर्ली या ठिकाणी जाण्याबाबत चाैकशी केली. स्थानिक व्यावसायिकांकडे याबाबत चाैकशी केल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.गणपतीपुळे परिसरातील आपटा, काेल्हटकर तिठा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली हाेती. त्यामुळे वाहनांची काेंडी झाली हाेती. जयगड पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळेच्या पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळवी, पोलिस नाईक जयेश कीर, पोलिस कॉन्स्टेबल नीलेश गुरव, पोलिस कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व वाहतूककाेंडी सुरळीत हाेण्यासाठी प्रयत्न केले, तसेच रत्नागिरीतूनही बंदोबस्तासाठी पाेलिस कर्मचाऱ्यांना बाेलावण्यात आले हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटनGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिरSea Routeसागरी महामार्ग