शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पाऊले कोकणाकडे, समुद्रकिनारी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 13:07 IST

पर्यटकांचे आगमन सुरू होणार असल्याने छोट्या-मोठ्या व्यवसायांना उभारी मिळणार

रत्नागिरी : दोन वर्षे असलेले कोरोना संकट थाेडे दूर झाले असून, नागरिकांच्या मनातील भीतीही कमी झाली आहे. हिवाळा सुरू झाला असून, येत्या काही दिवसांतच पर्यटकांची पाऊले कोकणाकडे वळणार आहेत. दिवाळीच्या सुट्टीत गणपतीपुळे, गुहागर, दापोली याठिकाणी समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी झाली असून, ही गर्दी अजून वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊनपासून दोन वर्षे पर्यटनावर निर्बंध होते. दिवाळीची सुट्टी सुरू आहे. भाऊबीज, पाडवा बुधवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाडवा झाल्यानंतर पर्यटक येण्यास प्रारंभ होणार आहे. कोकणचे सौंदर्य पर्यटकांना खुणावत असल्याने परजिल्ह्यातील तसेच दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पर्यटकांचे लवकरच कोकणात आगमन होणार आहे. पर्यटकांमुळे समुद्रकिनारे गर्दीने फुलणार आहेत.

जिल्ह्यातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, आरेवारे, पावस अशा ठिकाणी पर्यटक भेट देतात. समुद्र स्नानाचा आनंद पर्यटक घेतात. सांगली, सातारा, कोल्हापूर या लगतच्या जिल्ह्यातील पर्यटक सकाळी येऊन सायंकाळी परतीचा प्रवास करतात. तर काही पर्यटक मात्र निवासासाठी थांबतात. जिल्ह्यातील दापाेली तालुक्यातील मुरूड किनाऱ्यावर पर्यटक दाखल हाेऊ लागले आहेत. त्याचबराेबर रत्नागिरी शहरातील भाट्ये, मांडवी किनाऱ्यावरही स्थानिकाबरोबर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.

व्यवसायांना मिळणार उभारी

पावसाळ्यात पर्यटकांची फारशी गर्दी नसते. पर्यटकांचे आगमन सुरू होणार असल्याने छोट्या-मोठ्या व्यवसायांना उभारी मिळणार आहे. हिवाळी पर्यटनासाठी विदेशातील पर्यटक वाढण्याची शक्यता आहे. शहरातील लोकमान्य टिळक जन्मस्थान, मत्स्यालय, थिबा राजवाडा आदी प्रमुख स्थळांचे पर्यटकांना खास आकर्षण आहे. याठिकाणी पर्यटक भेट देतात.

दिवाळीसाठी आधीच आरक्षण

दिवाळीची जोडून सुट्टी असल्याने पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवास व्यवस्थेबरोबर खासगी हॉटेल्समधूनही आगाऊ आरक्षण सुरू झाले आहे. पर्यटन सुरू होणार असल्याने व्यावसायिकांना दिलासा प्राप्त झाला आहे. वॉटर स्पोर्टचे पर्यटकांना आकर्षण असून, समुद्रसफारीचा आनंद लुटला जाणार आहे.

पावसाळ्यात पर्यटकांची फारशी गर्दी नसते. परंतु, दिवाळीची सुट्टी सुरू झाली असून पाडवा, भाऊबीजेनंतर पर्यटकाची गर्दी वाढणार आहे. निवासासाठी येणाऱ्या पर्यटकांपेक्षा एका दिवसात परत फिरणारे पर्यटक अधिक असतात. मंदिरात दर्शनासाठी गर्दी होणार आहे, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. -विनायक राऊत, सचिव, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDiwaliदिवाळी 2022tourismपर्यटन