शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या हंगामात रत्नागिरीतील पर्यटनस्थळे बंद, पर्यटकांचा हिरमोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 12:46 IST

पर्यटनस्थळे सर्व वारी सुरू ठेवावीत, असे आदेश. परंतु, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही

रत्नागिरी : सध्या ख्रिसमसची सुट्टी पडल्याने पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली आहेत. विशेषत: समुद्रकिनाऱ्याचे पर्यटकांना आकर्षण असल्याने रत्नागिरी तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. एकीकडे पर्यटकांची संख्या वाढत असतानाच रत्नागिरीतील पर्यटनस्थळे मात्र बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.नाताळची सुट्टी आणि शनिवार, रविवार जोडून आलेली सुट्टी यामुळे पर्यटकांची पावले रत्नागिरीकडे वळली आहेत. कोकणातील समुद्रकिनाऱ्याला पर्यटक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे श्रीक्षेत्र गणपतीपुळेतील गणेश मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे. पर्यटकांनी गर्दी केल्याने स्थानिक दुकानदारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या सरस बचत गटांच्या प्रदर्शनालाही पर्यटक हजेरी लावत आहेत.गणपतीपुळे येथील पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर पर्यटक रत्नागिरीतील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी येत आहेत. मात्र, ही पर्यटनस्थळे सोमवारी बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. रत्नागिरीतील टिळक जन्मभूमी व थिबा पॅलेस ही पर्यटनस्थळे सोमवारी म्हणून बंद ठेवण्यात आली होती. थिबा पॅलेसच्या आवाराबाहेर तसा फलकही लावण्यात आला आहे.त्यामुळे बाहेर जाऊन आलेल्या पर्यटकांची व सहलीतील मुलांची मोठी निराशा झाली. ही स्थळे सर्व वारी सुरू ठेवावीत, असे आदेश देण्यात आले होते. परंतु, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने पर्यटनाला त्याचा फटका बसत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन