शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटक कोकणाकडे, निवासस्थानांचे १०० टक्के आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 19:49 IST

31st December party Ratnagiri -लॉकडाऊन शिथील होताच कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ लागले आहेत. पर्यटक निवासासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना प्रथम पसंती देत असल्याने सध्या कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमधील निवासस्थानांचे १०० टक्के आरक्षण झाले आहेत.

ठळक मुद्देपर्यटक कोकणाकडे, निवासस्थानांचे १०० टक्के आरक्षणगर्दी आता ५ जानेवारीपर्यंत कायम राहणार

रत्नागिरी : लॉकडाऊन शिथील होताच कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ लागले आहेत. पर्यटक निवासासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना प्रथम पसंती देत असल्याने सध्या कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमधील निवासस्थानांचे १०० टक्के आरक्षण झाले आहेत.कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर देशातील व्यवहार सुरळीत होण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर आता लॉकडाऊन शिथील करण्यात आले असून, पर्यटनस्थळेही खुली करण्यात आली आहेत. मात्र, या कालावधीत पर्यटनच थांबल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एम. टी. डी. सी.) सर्व निवासस्थाने बंद होती. त्यामुळे महामंडळाचे करोडो रूपयांचे नुकसान झाले.सप्टेंबर महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये बऱ्याच अंशी शिथिलता आली. त्यामुळे पर्यटनालाही हिरवा कंदील मिळाला. पर्यटकांसाठी पर्यटन महामंडळाने कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, वेळणेश्वर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, हरिहरेश्वर या पाच ठिकाणची आपली सर्व निवासस्थाने निर्जंतूक करून ठेवली होती. त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांच्या तपासणीसाठी ऑक्सिमीटर, थर्मल गन तसेच सॅनिटाईझरची व्यवस्था केली होती.कर्मचाऱ्यांनाही शारीरिक अंतर तसेच कोरोनाच्या अनुषंगाने मास्क, फेसशिल्ड, हॅण्डग्लोव्हज् आणि सॅनिटायझर आदी आवश्यक ती खबरदारी घेण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. त्यांची चाचणीही करण्यात आली. सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतल्याने आता पर्यटक पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. आताच १०० टक्के आरक्षण फुल्ल झाले असून, ही गर्दी आता ५ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे.गेल्या आठ महिन्यांपासून घरातच राहिलेले नागरिक आता दोन दिवसांसाठी का होईना पर्यटनासाठी जाण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे सलग दोन दिवसांची सुट्टी मिळताच फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे आता पर्यटन महामंडळाच्या निवासस्थानी गर्दी होऊ लागली असल्याचे विभागीय पर्यटन अधिकारी दीपक माने यांनी सांगितले.ऑनलाईन आरक्षणाची सुविधामहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ऑनलाईन आरक्षणाचीही सुविधा उपलब्ध क़रून दिली आहे. आता प्रत्येक शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शासकीय कार्यालयांना सुट्टी मिळते. त्यामुळे या सुट्टीचा फायदा घेत, गेले आठ महिने घरातच राहिलेला पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडू लागला आहे. 

टॅग्स :tourismपर्यटनRatnagiriरत्नागिरी31st December party31 डिसेंबर पार्टी