शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
2
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
3
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
4
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
5
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
6
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
7
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
8
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
9
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
10
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
11
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
12
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
13
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
14
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
15
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
17
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
18
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
19
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
20
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश

पर्यटन महोत्सवाची रंगत वाढविणार

By admin | Updated: March 25, 2015 00:46 IST

भाट्येतील महोत्सव : विविध स्पर्धा घेण्याची घोषणा

रत्नागिरी : रत्नागिरीतील भाट्ये बीच येथे दि. २, ३ व ४ मे २०१५ रोजी होणाऱ्या जिल्हा पर्यटन महोत्सवासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अशा स्पर्धांमुळे या महोत्सवात अधिक रंगत भरण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धाची तयारी सुरू आहे. विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दिलेल्या मुदतीत आपल्या प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजन समिती अध्यक्षांनी केले आहे.यानिमित्ताने कोकणातील कलावंतांना प्रतिनिधीत्त्व करण्याची संधी मिळणार असून तयार केलेले लोगो व घोषवाक्य चित्रकृती, छायाचित्रांसह आपल्या प्रवेशिका १५ एप्रिल पूर्वी पाठवाव्यात. घोषवाक्य व लोगो स्पर्धेसाठी आशय ‘रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१५’ असा आहे. घोषवाक्य ६ शब्दांपर्यंत असावे. एका स्पर्धकाने जास्तीत जास्त ५ लोगो किंवा ५ घोषवाक्य पाठवावीत. कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतील. संबंधित लोगो व घोषवाक्य अन्य उपक्रमात वापरण्याचा हक्क आयोजन समितीकडे राहील. लोगोची सॉफ्ट कॉपी ३१ मार्चपर्यंत १३ल्ल.’ङ्मॅङ्म.ूङ्मेस्र@ॅें्र’.ूङ्मे वर पाठवावी. ई-मेलमध्ये स्पर्धकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, छायाचित्राचे ठिकाण हा तपशील नमूद करावा. घोषवाक्यांची सॉफ्टकॉपी ३१ मार्च २०१५ पर्यंत १३ल्ल.२’ङ्मँल्ल.ूङ्मेस्र@ॅें्र’.ूङ्मे वर पाठवावी. छायाचित्र स्पर्धेचा विषय रत्नागिरी जिल्ह्यातील लोकजीवन निसर्ग, पर्यटनस्थळे असा आहे. स्पर्धांमध्ये कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतील. स्पर्धेसाठी एका स्पर्धकाने जास्तीत जास्त ए४ आकाराची १० छायाचित्रे पाठवावीत. छायाचित्रावर कुठल्याही प्रकारचे लेखन, नाव, वॉटरमार्क किंवा इतर सजावट नसावी. हार्डकॉपी १५ एप्रिल पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल शाखा) किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय चिपळूण, दापोली येथे कार्यालयीन वेळेत पाठवावी. सॉफ्टकॉपी १५ एप्रिलपर्यंत १३ल्ल.स्रँङ्म३ङ्म.ूङ्मेस्र@ॅें्र’.ूङ्मेवर पाठवावी. ई-मेलमध्ये स्पर्धकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, छायाचित्राचे ठिकाण हा तपशील नमूद करावा. हार्डकॉपी सोबत छायाचित्र स्वत काढले असल्याचे हमीपत्र द्यावे, स्पर्धेसाठी हार्डकॉपी ग्राह्य धरली जाईल.चित्रकला स्पर्धेचा विषय रत्नागिरी जिल्हयातील लोकजीवन, निसर्ग, पर्यटनस्थळे असा आहे. स्पर्धांमध्ये कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतील. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी 0२३५२ २२३६०२, 0२३५५-२५२०४६, 0२३५८-२८२०३१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजन समिती अध्यक्षांनी कळवले आहे. (प्रतिनिधी)