शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri, Tiware Dam Breached: ...तर धरण दुर्घटना टळली असती; अनेकांचे प्राण वाचले असते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 11:15 IST

आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह हाती; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

रत्नागिरी: तिवरे धरण फुटल्यानं परिसरात घबराट पसरली आहे. काल रात्री नऊच्या सुमारास तिवरे धरण फुटलं. यामध्ये 24 जण वाहून गेले. आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेला 12 तास उलटल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरण फुटल्यानं 13 घरं वाहून गेल्यानं वित्तहानीदेखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता असता.तिवरे धरणाला दुरूस्तीची गरज असल्याचं आधीच लक्षात आलं होतं. खासदार विनायक राऊत यांनी त्याची दखल घेत या कामाकडे लक्ष देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. त्यावेळी माती टाकून दुरूस्ती करण्याचा प्रयत्न झाला. धरण दुरूस्तीसाठी निधीचा प्रस्ताव आधीच पाठवण्यात आला होता. तो निधी वेळेत मिळाला असता तर, सर्व ग्रामस्थांचे प्राण वाचले असते.तिवरी धरण २0१२ साली बांधून पूर्ण झाले. २.४५२ दशलक्ष घनमीटर इतकी त्याची पाणी साठवणुकीची क्षमता आहे. या धरणाची दुरूस्ती करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी वारंवार निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार लघुपाटबंधारे विभागाकडून त्यासाठी निधीही मागणी करणारा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीमुळे खासदार विनायक राऊत यांनी पाटबंधारे खात्याला धरण दुरूस्तीच्या सूचनाही केल्या. त्या सूचनांमुळे पाटबंधारे खात्याकडून दोन डंपर माती टाकून दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र चार दिवसांच्या पावसाने ही डागडुजीही कमकुवत ठरवली. आता या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.  

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRatnagiri Tiware Damरत्नागिरी तिवरे धरण