शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कोकणात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई, तीन बांग्लादेशी घूसखोर ताब्यात

By संदीप बांद्रे | Updated: October 5, 2023 15:45 IST

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड कागदपत्रे कोणत्या आधारे मिळवली

चिपळूण : बांग्लादेशातून भारतात खूसघोरी करून आलेल्या तिघांना चिपळूण शहरानजीकच्या खेर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. गेले काही महिने ते तेथे वास्तव्यास होते. त्यांच्यावर रत्नागिरीतील दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांकडून काही कागदपत्रे हस्तगत केले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता ६ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.गुल्लू हुसेन मुल्ला (५६), जिलानी गुल्लू मुल्ला (२६), जॉनी गुल्लू मुल्ला (२९, तिघेही बांग्लादेश) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोबाईल, आधारकार्ड, पॅनकार्ड व निवडणूक ओळखपत्र अशी कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. खेर्डी मोहल्ला येथील शिगवणवाडी परिसरात ते काही महिन्यांपासून वास्तव्य करीत होते. परंतू बाग्लादेश हून भारतात अवैधरित्या प्रवेश करून मुलखी अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय वास्तव्य करीत होते. याविषयीची रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळताच त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी रात्री १०.३० वाजता कारवाई करून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी त्यांची चौकशी करून तत्काळ गुन्हा दाखल केला. पारपत्र अधिनियम ३ (ए) ६, परकीय नागरिक आदेश कायदा ३ (१) (ए) व विदेशी व्यक्ती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल उदय चांदणे, आशिष शेलार यांनी ही कारवाई केली. यानंतर या तिघांना चिपळूण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत. कागदपत्रे कोणत्या आधारे मिळवलीमुळचे बांग्लादेशी असलेले गुल्लू मुल्ला व त्याच्या दोन्ही मुलांकडे भारतीय नागरिकांप्रमाणे आधार कार्ड, निवडणूक मतदार असलेले ओळखपत्र, पॅनकार्ड अशी कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यामुळे नागरीकत्व नसताना देखील ही कागदपत्रे कोणत्या आधारे त्यांनी मिळवली. तसेच या कागदपत्रांच्या आधारे त्यानी कोण-कोणते व्यवहार केले, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे पुढील पोलिस तपासात कोण-कोणत्या गोष्टी उघड होतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAnti Terrorist Squadएटीएस