शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील आंगले, बाकाळेत आणखी तीन कातळशिल्पे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 13:15 IST

कातळशिल्पाचे नंदनवन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राजापूर तालुक्यातील आंगले, बाकाळे व रानतळे परिसरात आणखी तीन नवीन कातळशिल्पे सापडली आहेत. त्यामध्ये दोन ठिकाणी मानवाकृती तर एका ठिकाणी एकशिंगी गेंडा अशा स्वरुपाची शिल्पे आहेत. दरम्यान, कातळशिल्पांचे शोधक धनंजय मराठे व सुधीर रिसबुड यांनी आंगले येथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने गावात सापडलेल्या कातळशिल्पांची साफसफाई केली.

ठळक मुद्देराजापूर तालुक्यातील आंगलेबाकाळेत आणखी तीन कातळशिल्पे

राजापूर : कातळशिल्पाचे नंदनवन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राजापूर तालुक्यातील आंगले, बाकाळे व रानतळे परिसरात आणखी तीन नवीन कातळशिल्पे सापडली आहेत. त्यामध्ये दोन ठिकाणी मानवाकृती तर एका ठिकाणी एकशिंगी गेंडा अशा स्वरुपाची शिल्पे आहेत. दरम्यान, कातळशिल्पांचे शोधक धनंजय मराठे व सुधीर रिसबुड यांनी आंगले येथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने गावात सापडलेल्या कातळशिल्पांची साफसफाई केली.कोकण पर्यटनाच्या नकाशावर वेगाने झेपावणाऱ्या कातळशिल्प या कलेची दखल घेणाऱ्या राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कातळशिल्पांचे संरक्षण, जतन व संवर्धन करण्याचा निर्णय घेताना चोवीस कोटी निधीची प्रथमच तरतूद केली होती. त्यामुळे कातळशिल्प या कलेचे महत्त्व गडद झाले आहे . कोकण पर्यटनाचा विचार करता कातळशिल्पांमुळे पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस येऊ लागले आहेत.कोकणात विविध ठिकाणी मागील काही वर्षात कातळशिल्पे सापडली आहेत. त्यामध्ये राजापूर तालुका आघाडीवर आहे. तालुक्यातील अनेक गावात कातळशिल्पे यापूर्वी सापडली होती. त्याचे शोधन धनंजय मराठे व सुधीर रिसबुड यांच्या प्रयत्नाने झाले होते. तालुक्याच्या विविध भागात आणखी कातळशिल्पे सापडतील, अशी शक्यता दाट बनल्याने धनंजय मराठे व सुधीर रिसबुड यांनी आपली शोधमोहीम अजूनही चालूच ठेवली आहे.त्यांना तालुक्यातील बाकाळे, आंगले व रानतळे याठिकाणी कातळशिल्पे असल्याची माहिती मिळाली व त्यानंतर त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन खातरजमा केली. त्यावेळी तीनही ठिकाणी प्रत्येकी एकेक कातळशिल्प आढळून आले. त्यामध्ये बाकाळे येथील मंदार परांजपे यांनी दिलेल्या माहितीवरुन तेथे मानावाकृती कातळशिल्प आढळले.रानतळे येथे एकशिंगी गेंडा शिल्प सापडले असून, ते नऊ फूट लांब तर आठ फूट रुंद आहे. आंगले येथील कातळशिल्प हे शशिकांत काकिर्डे यांच्या जागेत असून, ते मानवाकृती चौकोनी स्वरुपाचे आहे. त्याची लांबी व रुंदी ही सतरा फूट असल्याची माहिती धनंजय मराठे यांनी दिली. आंगले शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी या कातळशिल्पांची साफसफाई केली.

कातळशिल्पांमुळे कोकणचे नाव उज्वल व्हावेकोकण पर्यटनाच्या माध्यमातून येथील कातळशिल्पांचे जतन करणे, त्यांचे संवर्धन करुन पर्यटनवाढीला प्रोत्साहन मिळावे हा आमचा उद्देश आहे. ही कातळशिल्पे कोकणच्या वैभवात अधिक भर घालण्याचे काम करतील. जगाच्या नकाशावर कातळशिल्पांमुळे कोकणचे नाव उज्ज्वल व्हावे, यासाठी या शिल्पांच्या संवर्धनासाठी आपण कटीबध्द आहोत.धनंजय मराठेकातळशिल्प शोधक, राजापूर

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcultureसांस्कृतिक