शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

काताळेत नऊ वर्षांनंतर शिमग्याचे तीन होम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 11:51 IST

Holi Ratnagiri-गुहागर तालुक्यातील काताळे गावातील अंतर्गत वादामुळे एकाच ठिकाणी होणारे होम यावर्षी मात्र पूर्वांपार जागी लावण्यात आले. ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे तब्बल ९ वर्षांनंतर शिमगोत्सवातील तीनही होम पूर्वांपार लागल्याने ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला.

ठळक मुद्देगुहागर तालुक्यातील अंतर्गत वादावर पडदा ग्रामस्थांनी केली दिलजमाई, एकोप्याने उत्सव साजरा

आबलोली : गुहागर तालुक्यातील काताळे गावातील अंतर्गत वादामुळे एकाच ठिकाणी होणारे होम यावर्षी मात्र पूर्वांपार जागी लावण्यात आले. ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे तब्बल ९ वर्षांनंतर शिमगोत्सवातील तीनही होम पूर्वांपार लागल्याने ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला.काताळे येथील ग्रामदेवता श्री भैरी, कालकी, चंडिका देवीचे पारंपरिक तीन शिमगे वेगवेगळ्या जागृत ठिकाणी म्हणजेच कदमवाडी सहाणेवर पहिला होम, कोंडचा भैरी देव मंदिर येथे दुसरा होम, तर सोमनाथ मंदिर येथे तिसरा होम, अशा प्रकारे होत असत; परंतु सन २०१३ साली झालेल्या गावातील काही अंतर्गत वादामुळे गुहागर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गावातील मानकरी यांनी पूर्ण शिमगोत्सव बंद होण्यापेक्षा या वादावर तोडगा म्हणून तिन्ही शिमगे एकाच ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार नऊ वर्षे कोणतेही वादविवाद न होता कमी लोकसंख्या असूनही उत्सव आनंदाने होत आहे.पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे होम सुरू केले तर आणखी लोक या उत्सवात आनंदाने सहभागी होतील या अपेक्षेने स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने हे होम यावर्षीपासून पूर्वीप्रमाणे त्या त्या ठिकाणी करण्याचे ठरले.पहिला होम ग्रामदैवत मंदिर येथील जवळच सहाणेवर लागल्यानंतर दुसऱ्या होमचे म्हणजेच कोंडचा भैरी देव मंदिर हे ठिकाण दूर असल्याने या ठिकाणी पालखी वाहनाने घेऊन जाण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला व तिसरा होम सोमनाथ मंदिर येथे लागल्यानंतर नेहमीप्रमाणे पालखी हळदी-कुंकू समारंभासाठी अरुण कदम यांच्याकडे जाऊन येईल व नंतर सहाणेवर एकाच ठिकाणी गावातील प्रत्येक वाडीच्या पूजा, आरत्या प्रत्येक वाडीनुसार त्या त्या दिवशी होतील, नंतर सत्यनारायणाची महापूजा होईल. दुसऱ्या दिवशी पालखी देवळात जाईल, असे ठरविण्यात आले.हा उत्सव नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यास अरुण कदम, जयवंत कदम, दिलीप काताळकर, नामदेव बारस्कर, पोलीस पाटील सचिन रसाळ तसेच देवस्थानचे सुधाकर बारस्कर, भिकू बारस्कर, सूर्यकांत काताळकर, मंगेश बारस्कर, महादेव बारस्कर, रवींद्र कुळये, दीपक बारस्कर, मधुकर अजगोलकर, दत्ताराम कुळये, सुरेश रसाळ, रमेश खारवटकर, प्रकाश सावंत यांसह ग्रामस्थ सहभागी होते. 

टॅग्स :HoliहोळीRatnagiriरत्नागिरी