शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी शहरात आढळले तीन मृत पक्षी, तपासणीसाठी पुण्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 13:51 IST

Bird Flu Ratnagiri- दापोली आणि गुहागरपाठोपाठ रत्नागिरी शहरात दोन दिवसात तीन मृत पक्षी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे तीनही मृत पक्षी तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. पुणे येथे स्क्रिनिंग केल्यावर काही संशास्पद आढळल्यास ते पक्षी पुढील तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी शहरात आढळले तीन मृत पक्षीतपासणीसाठी पुण्याला

रत्नागिरी : दापोली आणि गुहागरपाठोपाठ रत्नागिरी शहरात दोन दिवसात तीन मृत पक्षी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे तीनही मृत पक्षी तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. पुणे येथे स्क्रिनिंग केल्यावर काही संशास्पद आढळल्यास ते पक्षी पुढील तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविण्यात येणार आहेत.रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार बुधवारी रात्रीच्या सुमाराला येथे एक टिटवी पक्षी मृतावस्थेत आढळला. याबाबत नगर परिषदेचे आरोग्य सभापती निमेश नायर यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी नगरसेवक बाबा नागवेकर यांच्या घराजवळ दोन मृत कावळे आढळले. कावळे मृत पावल्याची कल्पना पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. विवेक पनवेलकर यांना देताच त्यांची यंत्रणा सतर्क झाली.याबाबत प्रशासनाकडून अथवा नगर परिषदेकडून पुढील कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. पुणे येथून अहवाल आल्यानंतर त्याबाबत काही निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा केली जात आहे.पशुसंवर्धन यंत्रणा सतर्करत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे १० ते १५ कावळे मृतावस्थेत आढळले होते. त्यांना बर्ड फ्लू झाल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले होते. त्यानंतर गुहागरात दोन कावळे मृतावस्थेत आढळले होते. दापोली, गुहागर पाठोपाठ आता रत्नागिरीतही पक्षी मृतावस्थेत आढळल्याने बर्ड फ्लूच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जिल्ह्यात मृत पक्षी आढळल्याने पशुसंवर्धनची यंत्रणा सतर्क झाली आहे. 

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूRatnagiriरत्नागिरी