शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी समर्थकांना ठार मारण्याच्या धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 17:24 IST

राजापूर तालुक्याच्या विकासाठी आणि बेरोजगार तरूणांच्य हाताला काम मिळावे यासाठी तालुक्यातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी व आयलॉग पोर्ट प्रकल्पाचे जोरदार समर्थन करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व समर्थकांना धमक्या देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे.

ठळक मुद्देरिफायनरी समर्थकांना ठार मारण्याच्या धमक्यामहिला जिल्हा परिषद सदस्याची पोलिसांकडे तक्रार

राजापूर : तालुक्याच्या विकासाठी आणि बेरोजगार तरूणांच्य हाताला काम मिळावे यासाठी तालुक्यातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी व आयलॉग पोर्ट प्रकल्पाचे जोरदार समर्थन करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व समर्थकांना धमक्या देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे.

या दोन्ही प्रकल्पाचे जाहीरपणे समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या सागवे विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांना सागवे भागातील काही पुरूष व महिलांनी एका खासगी वृत्त वाहिनीवर प्रतिक्रिया देताना आपणाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.याबाबत त्यांनी नाटे पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. प्रकल्पांना विरोध करणाऱ्या एका पुढाऱ्याच्या जीवावर ही काही मंडळी आपल्याला धमकी देत असून यांच्यापासून आपल्या जीविताला धोका असून, यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवलकर यांनी केली आहे.आपण प्रकल्पाचे समर्थन केल्याचा राग मनात धरून सागवे कात्रादेवी गावातील शीतल सीताराम गुरव, वर्षा रवींद्र गुरव, राजश्री राजेंद्र पुरळकर, परशुराम कृष्णा पुजारी व अजय लक्ष्मीकांत राणे यांनी आपल्या विरोधात एका खासगी वृत्त वाहिनीवर भडकावू विधान केले आहे. आपणाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. त्याची चित्रफित सोशल मीडियावर फिरवून आपली बदनामीही केली आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या एका पुढाऱ्याच्या जीवावर ही मंडळी आपणाला अशा धमक्या देत असून, त्यांच्यापासून आपल्या जीविताला धोका असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.तर जशास तसे उत्तर देऊविकासासाठी प्रकल्पाचे समर्थन करताना सदनशीर व कायदेशीर मार्गाने आपली मागणी शासनापर्यंत पोहचविण्याचा मंदा शिवलकर व आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. प्रकल्पच्या समर्थनाच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र, यावरून कोण अशा प्रकारे धमक्या देण्याचा प्रयत्न करत असेल तर सागवे विभागातील शिवसेनेकडून आम्ही त्याचा जाहीर निषेध करत असल्याचे सागवे विभागप्रमुख राजा काजवे, डॉ. सुनील राणे, विद्याधर राणे, मंगेश मांजरेकर व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जशास तसे उत्तर कशा प्रकारे देतात हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी