शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अभियोग्यता चाचणीनंतर ते उमेदवार ठरणार अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:23 IST

टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण असताना अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा काही उमेदवारांनी दिली आहे. त्यानंतर टीईटी परीक्षा देऊन, पवित्र पोर्टलवर तशी नोंद करणारे उमेदवार शिक्षक भरतीसाठी अपात्र ठरविले जाणार आहेत.

ठळक मुद्देअभियोग्यता चाचणीनंतर ते उमेदवार ठरणार अपात्रउमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदी केल्याचे स्पष्ट

रत्नागिरी : टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण असताना अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा काही उमेदवारांनी दिली आहे. त्यानंतर टीईटी परीक्षा देऊन, पवित्र पोर्टलवर तशी नोंद करणारे उमेदवार शिक्षक भरतीसाठी अपात्र ठरविले जाणार आहेत.शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकरित्या राबवण्यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील बारा हजार शिक्षकांच्या पदांसाठी पहिल्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी एक लाख २३ हजार उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे.

नोंदणीकृत उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी नवीन सर्व्हर विकसित करण्यात आला आहे. त्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सर्व्हरची तांत्रिक तपासणी चालू असून, गेल्या काही दिवसांपासून पवित्र पोर्टलच बंद ठेवण्यात आले आहे. त्यावर कोणत्याही सूचना प्रसिध्द करण्यात येत नसल्याने उमेदवारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात भरती प्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित होत आहे.शिक्षक भरतीसाठी शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) व अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती केली आहे. टीईटी उत्तीर्ण नसताना काही उमेदवारांनी अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा दिली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर दि.१५ जुलै २०१८ रोजी टीईटी परीक्षा घेण्यात आली होती.

अभियोग्यता चाचणीनंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदी केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. मात्र या नोंदी इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी