शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात मराठी वाढवली त्यांचे कौतुक केले पाहिजे : नमिता कीर

By मेहरून नाकाडे | Updated: April 16, 2024 15:32 IST

रत्नागिरी : परदेशात साहित्य संमेलन घेणारी कोमसाप पहिलीच संस्था आहे. मॉरिशस येथील पूर्वजांनी मराठी जतन केली. परदेशात मराठी वाढवली ...

रत्नागिरी : परदेशात साहित्य संमेलन घेणारी कोमसाप पहिलीच संस्था आहे. मॉरिशस येथील पूर्वजांनी मराठी जतन केली. परदेशात मराठी वाढवली त्यासाठी नक्कीच या लोकांचे कौतुक केले पाहिजे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी केले.कोकण मराठी साहित्य परिषद आणि श्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृतीवर आधारित विशेष लोककलांचा कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर बोलत होत्या. यावेळी मॉरिशस मराठी कल्चरल सेंट्रल ट्रस्टचे अध्यक्ष पुतलाजी, मॉरिशस मराठी स्पिाकिंग युनिअनचे अध्यक्ष नितीन बाप्पू, इंटरनॅशनल कल्चरल अँड सोशल फोरम मॉरिशस दिलीप ठाणेकर, कोमसापचे मुख्य विश्वस्थ रमेश कीर, जयू भाटकर, गजानन पाटील उपस्थित होते.मॉरिशस मराठी कल्चरल सेंट्रल ट्रस्टचे अध्यक्ष अर्जन पुतलाजी यांनी मनोगत व्यक्त करताना, भारतातील हा माझा तिसावा दौरा आहे. मॉरिशसला पूर्वज गुलाम म्हणून गेले. त्यांनी भाषा, संस्कृती टिकवण्याचे काम केले. पुढे जाऊन मराठी भाषा व संस्कृती जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. त्याला जोड म्हणून रत्नागिरीत होत असलेल्या या पहिल्या कार्यक्रमासाठी नमिता कीर यांनी पुढाकार घेतला असल्याचे सांगितले.सुत्रसंचालन माधव अंकलगे यांनी केले. उद्घाटन सोहळ्यानंतर माॅरिशसच्या मंडळींनी विविध सांस्कृतिक कलांचे सादरीकरण केले. नृत्यातून गणेशवंदना, श्री विठ्ठल रखुमाई सादर केली. कोळीनृत्याचे ही सुरेख सादरीकरण केले. मराठी भाषेत एकांकिकेचेही सादरीकरण करून रसिकांकडून प्रशंसा मिळविली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी