शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी सेलला रत्नागिरीचे वावडे, विद्यार्थ्यांची फरफट; जिल्ह्यात दोनच केंद्र

By मेहरून नाकाडे | Updated: April 3, 2025 17:50 IST

मेहरून नाकाडे रत्नागिरी : बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर एमएचटी ...

मेहरून नाकाडेरत्नागिरी : बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर एमएचटी सीईटी परीक्षा द्यावी लागते. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी साडेपाच ते सहा हजार विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेची परीक्षा देतात. मात्र रत्नागिरी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असताना शहरात एकही परीक्षा केंद्र नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी फरफट तर होते, शिवाय पालकांना आर्थिक भुर्दंडही बसत आहे.एमएचटी सीईटी परीक्षेसाठी अभ्यासक्रम हा बारावी विज्ञान अभ्यासक्रमासारखाच असतो. यात काही बदल नसतो. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून घेतली जाते. अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भाैतिकशास्त्र, रसायनशास्त्र, किंवा गणित या तीन विषयातील दाेन विषयांचा पेपर द्यावा लागतो, तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र, अर्थशास्त्र किंवा जीवशास्त्र या विषयाचा पेपर द्यावा लागतो.

आवश्यक सुविधाऑनलाईन परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे त्यासाठी सुसज्ज अभियांत्रिकी महाविद्यालयाची आवश्यकता आहे. त्यामध्ये २०० ते ३०० संगणक, सर्व संगणक लॅन नेटवर्कमध्ये असणे आवश्यक आहे. त्याशिवाय उत्तम नेटवर्क, वीजप्रवाह खंडित झाल्यास तातडीने बॅकअप सुविधा, सीसीटीव्ही यंत्रणा, वाॅशरूम, परीक्षा घेण्यासाठी मनुष्यबळ या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. रत्नागिरी शहरात या सुविधा उपलब्ध असताना विद्यार्थ्यांना अन्य तालुक्यात जावे लागते, हे दुर्दैव आहे.

जिल्ह्यात दोन केंद्रचरत्नागिरी शहर हे जिल्ह्याचे महत्वपूर्ण ठिकाण आहे. असे असताना व शहरात अभियांत्रिकी महाविद्यालय असतानाही परीक्षा न होता, भरणे (खेड) व गतवर्षीपासून खेर्डी (चिपळूण) येथे परीक्षा घेण्यात येत आहे. मंडणगड ते राजापूरपर्यंत जिल्ह्याचा विस्तार आहे. तेथील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी भरणे किंवा खेर्डी या केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागत आहे.

दोन तास आधी रिपोर्टिंगपरीक्षेपूर्वी दोन तास आधी रिपोर्टिंग करावे लागते. त्यामुळे सकाळी ९ वाजता पेपर असला तर सात वाजता रिपोर्टिंग द्यावे लागते. परिणामी जिल्हाभरातून परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक तर परीक्षेच्या आदल्या दिवशी वस्तीला जावे लागते. अन्यथा पालकांना खासगी वाहनांसाठी पैसे मोजावे लागतात. एकूणच परीक्षा व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांची फरफट तर होते, पालकांनाही आर्थिक भुर्दंड बसत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीexamपरीक्षा