शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची माती न होण्यासाठी मजबूत धोरण हवे

By मनोज मुळ्ये | Updated: April 30, 2024 17:18 IST

शेतकऱ्यांना मिळायला हवी लोकप्रतिनिधी आणि सरकारच्या धोरणांची साथ

रत्नागिरी : भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे शालेय अभ्यासक्रमातील वाक्य प्रत्यक्षात मात्र खरे होत नाही. प्रादेशिक रचनेनुसार कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रांमधील धोरणांमध्ये बदल करणे गरजेचे असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ज्या कोकणात पूर्वी खाडीकिनारी द्विदल धान्य मुबलक पिकत होती, तिथे आता रखरखाट दिसतो. कोकणातील माती कसदार आहे. या मातीला धोरणांचे खतपाणी दिले, तर शेतीमधील गतवैभव परत मिळू शकतील, हे नक्की.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची भौगोलिक रचना, हवामान सारखेच आहे. दोन्ही ठिकाणच्या शेतीबाबतच्या समस्याही सारख्याच आहेत. तुकड्या-तुकड्यांची शेती दोन्ही जिल्ह्यांत आहे. त्यामुळे शेती फायदेशीर होत नाही, अशी ओरड दोन्ही जिल्ह्यांमध्ये आहे. एकीकडे उद्योग नाहीत आणि दुसरीकडे शेतीतून कुटुंबाचे पोट भरत नाही. त्यामुळे कोकणी माणसाला मुंबईची वाट धरण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने काही धाेरणात्मक बदल केले, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शेतीला महत्त्व दिले, तरच यात सुधारणा होईल. नाहीतर शेतीची माती होण्यास वेळ लागणार नाही.

सामूहिक शेतीला प्रोत्साहन गरजेचे१. तुकड्यातुकड्यांची शेती फायदेशीर होत नाही. कमी क्षेत्रामुळे यांत्रिक अवजारांचा वापर करता येत नाही. आधुनिकता आणता येत नाही. त्यात मजुरांची समस्या खूप वाढत आहे.२. या सर्वासाठी सामूहिक शेती हा चांगला पर्याय ठरू शकतो. त्याला प्रोत्साहन देणारे सरकारी धोरण गरजेचे आहे. या माध्यमातून पाणी उपलब्ध आहे, तिथे दुबार शेतीही यशस्वी होऊ शकेल.

पाणी अडवण्याच्या योजनेत बदल हवा

  • शेतीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती पाणी. डिसेंबर महिन्यापासून कोकणातील नद्या, नाले, विहिरींमधील पाणी कमी होत जाते.
  • भरपूर पाऊस असला, तरी जांभ्या दगडामुळे पाणी झिरपून समुद्राला जाऊन मिळते. यावर पर्याय शोधायला हवा. अशा जमिनीमध्येही पाणी टिकवून ठेवण्यासाठी काय करायला हवे, यासाठी तज्ज्ञांची मते घ्यायला हवीत.
  • प्रदेश-प्रदेशाची भौगोलिक रचना वेगळी आहे. त्यामुळे एकच योजना महाराष्ट्रभर वापरण्यात अर्थ नाही. पाणी अडवणुकीच्या प्रादेशिक योजनाच यातून तारू शकतात.
  • त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्यांशी संवाद हवा.

माकडे, वानरे त्रासदायकसध्या जी काही लागवड होत आहे, त्याला माकडे आणि वानरांचा खूप त्रास आहे. त्यावर काहीच पर्याय निघत नसल्याने अनेकजण शेती सोडण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. असे झाल्यास उद्या इथे प्रत्येक गोष्ट बाहेरूनच आणावी लागेल. इथली शेती टिकून राहायला हवी. त्यासाठी माकडांचा प्रश्न आधी सोडवायला हवा.

भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन द्यायला हवेजिल्ह्यात घराच्या परसदारी लागवड हाेणारी पालेभाजी वगळता जिल्ह्यात व्यावसायिक पद्धतीने भाजीची लागवड होत नाही. समूह शेतीच्या माध्यमातून व्यावसायिक पद्धतीने भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन द्यायला हवे. तयार माल बचत गटांच्या माध्यमातून विक्रीला जायला हवा, म्हणजे शेतकरी आणि बचत गट दोघांचाही यातून फायदा होऊ शकेल. त्यासाठी सरकारी योजनांची गरज आहे.

प्रक्रिया उद्योगांवर विशेष भर हवाअनेकदा स्थानिक शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. त्यासाठी त्यावरील स्थानिक उत्पादनांवरील प्रक्रिया उद्योगाला चालना द्यायला हवी. तसे झाल्यास उत्पादनांना चांगला भाव मिळू शकेल. करवंद, जांभळे यांसारख्या स्थानिक उत्पादनांची व्यावसायिक लागवड न होण्यास तेच कारण आहे. हंगामी असला, तरी हा व्यवसाय अनेकांना रोजगार उपलब्ध करून देईल.

कमी पाण्यावरील पिकांचे पर्याय लाेकांसमाेर ठेवायला हवेत१. कोकणातच काम करणारे दापोलीचे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ अत्यंत सक्षम आहे. भात, आंबा, काजू नारळासह अनेक शेतमालाच्या नव्या जाती विद्यापीठाने शोधल्या आहेत, पण पावसाळी शेतीनंतर पाण्याअभावी जमिनी तशाच पडून राहतात, ही मोठी समस्या आहे आणि त्यावर पर्याय शोधणे गरजेचे आहे.२. कमी पाण्यामध्येही घेता येतील अशी पिके विशेषत: भाजीपाला यावर संशोधन व्हायला हवे. भाजीपाल्याला बाजारपेठेची वानवा नाही. त्यातही गावठी भाजीला अधिक भाव मिळतो. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवा, तरच शेतीला ‘अच्छे दिन’ येतील.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Agriculture Sectorशेती क्षेत्र