शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : शीळ धरण परिसरात डोंगर खचताेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 18:46 IST

रत्नागिरी : समाधानकारक पावसामुळे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण भरुन वाहू लागले आहे. धरणाच्या सांडव्यावरुन पाणी जाऊ लागले ...

रत्नागिरी : समाधानकारक पावसामुळे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण भरुन वाहू लागले आहे. धरणाच्या सांडव्यावरुन पाणी जाऊ लागले लागल्यामुळे नदीपात्राची पातळी वाढलेली आहे. या सांडव्यापासून काही अंतरावर असलेला डोंगराचा भाग यंदाच्या पावसात खाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.रत्नागिरी शहराला लागणारे पाणी पुरवठा करण्यासाठी शीळ येथे धरण बांधण्यात आले. पाण्याची वाढती गरज लक्षात घऊन धरणाची साठवण क्षमता वाढविण्यात आली. त्यासाठी शेजारी सांडवा बांधण्यात आला होता. गेल्या महिन्याभरात रत्नागिरीत सरासरी पावसाची नोंद चांगली झाली आहे. त्यात धरणक्षेत्रांमध्ये पाऊस समाधानकारक आहे. त्याचा फायदा शीळ धरणातील पाणी साठा वाढीला झाला आहे. आठ दिवसांपुर्वीच धरणातील सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे.यंदा रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मे महिन्याच्या अखेरीस एक दिवसाआड पाणी सुरु ठेवण्यात आले. मॉन्सून लांबल्यामुळे मृत साठा वापरण्याची वेळ आली होती; परंतु ९ जूननंतर अधुनमधून पडणार्‍या सरींनी दिलासा दिला. धरण क्षेत्रातही पाणी वाढू लागले. सध्या धरणात पुरेसा साठा झाला असून, सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.मुसळधार पावसाचा जोर वाढला की सांडव्यापासून काही अंतरावर असलेल्या भागात भूस्खलन होते. गेली पाच वर्षे सातत्याने येथील डोंगरातील दगड, माती कोसळत आहे. धरण भरुन वाहू लागल्यामुळे भविष्यात येथील भाग कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गतवर्षी कोसळलेल्या दरडीपासून काही अंतरावर घरे आहेत. त्या घरांना याचा धोका निर्माण होऊ शकतो. पावसाचा जोर जुलै महिन्यात वाढत असल्याने भूस्खलनाची टांगती तलवार कायम राहणार आहे.प्रस्ताव तयार, निधी?शीळ धरणाच्या सांडव्याजवळील झालेल्या भूस्खलनावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला निधी मंजूर झाला की त्यावर कार्यवाही होणार होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी