शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांना विरोध अन् नोकरीसाठी ओरड; कोकणातील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 19:10 IST

नोकरी देण्याच्या घोषणांचा पाऊस, पण येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध

रत्नागिरी : मतांच्या राजकारणासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करायचा आणि निवडणुकीच्या काळात रोजगाराच्या नावाने ओरड करायची, अशी स्थिती कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गेली अनेक वर्षे कायम आहे. एका पक्षाने प्रकल्प आणला की दुसऱ्याने तो घालवायचा, या प्रकारामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थलांतर वर्षानुवर्षे कायम आहे. रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या प्रचार सभेत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यास रोजगार देण्याचा नारा देतानाच बारसू रिफायनरी हद्दपार करण्याची घोषणाही केली.वर्षानुवर्षे कोकण केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकसाठीची बाजारपेठ बनून राहिला आहे. भाजीपाला, दूध, अन्नधान्य या रोजच्या वापराच्या आणि म्हणून सर्वाधिक खपाच्या गोष्टी पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येतात. किमान भाजीपाला आणि दूध यासाठी काेकण स्वयंपूर्ण करण्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने कधीही भर दिलेला नाही. त्यामुळेच वर्षानुवर्षे पोटापाण्यासाठी कोकणी लोकांनी मुंबई गाठली. आता लोक केवळ नोकरीसाठी बाहेर पडत नाहीत तर त्याआधी उच्च शिक्षणासाठीच बाहेर पडतात. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत नोकऱ्या उपलब्ध नाहीत. म्हणून ते कायमच जिल्ह्याबाहेर राहतात.

दरवेळी निवडणुका आल्यानंतर तरुणांच्या हाताला काम, रोजगार, प्रकल्प, पर्यटनातून विकास अशा गोष्टींवर उहापोह केला जातो. आम्ही अमुक करू, तमुक करू म्हणून घोषणा केल्या जातात. मात्र, वर्षानुवर्षे यात काहीच फरक पडलेला नाही. कोकण आहे तसाच राहिला आहे. कोकणाबाहेर राहणारे लोक कोकण असाच निसर्गसंपन्न राहू दे म्हणून इथल्या प्रकल्पांना विरोध करतात. पण प्रत्यक्षात कोकणातून कामासाठी बाहेर जाणाऱ्या तरुणांचा विचारच केला जात नाही.गेली अनेक वर्षे कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला गेला आहे. सिंधुदुर्गातील सी वर्ल्ड असो किंवा नाणारची रिफायनरी असो, रेडीमधील बंदर विकास असो किंवा राजापुरातील डॉकयार्ड असो, नव्याने येणारी एमआयडीसी असो किंवा मायक्रो चीपचा कारखाना असो प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला गेला आहे. याविरोधात राजकारणच अधिक झाले आहे. एखादा प्रकल्प जनहिताचा असेल तर त्याबाबत जनजागृती करण्यावर कोणाचाही भर नसतो. लोकांना हवंय ते, अशा नावाखाली प्रकल्पांना विरोध होतच राहतो.

जिल्ह्यात महिला मतदार अधिक का?राज्यात सर्वाधिक महिला मतदार रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. सिंधुदुर्गातही पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत. यामागचे कारण कोणी विचारात घेत नाही. कोकणात मुलींचा जन्मदर चांगला आहे, ही बाब खरी असली तरी येथील पुरुष मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी परजिल्ह्यात आहेत, हेदेखील त्याचे महत्त्वाचे कारण आहे. पण प्रत्येक प्रकल्पाला विरोध झाला तर कोकणातील तरुणांनी इथे राहून करायचे तरी काय?

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ratnagiri-acरत्नागिरीkonkanकोकणthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024