शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: देवी करंजेश्वरी देवस्थानच्या पालख्यांनी ४४ शेरणे शोधली!, गोवळकोट येथे मिरवणुकीने शिमगोत्सवाची सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:48 IST

यानंतर मशीद भेटचा अनोखा कार्यक्रम झाला. चौघुले कुटुंबीयांतर्फे मानाची आरती स्वीकारून हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली.

चिपळूण : संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेल्या शहरातील गोवळकोट-पेठमाप-मजरेकाशीचे देवस्थान श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचा शेरणे कार्यक्रम सोमवारी सायंकाळी वाशिष्ठी नदीच्या काठावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी देवीने १२३ पैकी ४४ शेरणे शोधून संबंधित भक्तांना कौल दिला आहे. गतवर्षी पुरलेल्या १३१ पैकी ३९ शेरणे शोधली होती. मंगळवारी गोवळकोट येथे मिरवणुकीने या शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली.शहरातील गोवळकोट-पेठमाप-मजरेकाशीवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवास मंगळवारपासून मंदिराभोवती पाच प्रदक्षिणाच्या रोमहर्षक कार्यक्रमाने व हजारो भाविकांच्या साक्षीने प्रारंभ झाला. त्यानंतर मंदिरापासून मशिदीपर्यंत पालखी मिरवणूक देऊळवाडी, सहाणवाडी, हरवडेवाडी येथील भाविकांच्या आरत्या स्वीकारत काढण्यात आली. यानंतर मशीद भेटचा अनोखा कार्यक्रम झाला. चौघुले कुटुंबीयांतर्फे मानाची आरती स्वीकारून हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली.त्यानंतर पालखी पुन्हा मागे वळवून सहाणवाडी येथे होम लावण्यासाठी आली. श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या दोन्ही पालख्यांचे गोविंदगडावर श्री देवी रेडजाई देवस्थानच्या भेटीचा कार्यक्रम पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या ठिकाणी मानकरी जगताप कुटुंबीयांतर्फे पूजा झाली व त्यानंतर पालखीचे पेठमापच्या दिशेने प्रयाण झाले. पेठमापवासीयांच्या आरत्या स्वीकारल्यानंतर देवीची ओटी भरण्याचा व करमणुकीचा कार्यक्रम झाला.सोमवारी या शिमगोत्सवातील प्रसिद्ध शेरणे कार्यक्रम झाला. मनात नवस बोलून लपविलेल्या १२३ शेरण्यांपैकी देवीने ४४ शेरणे शोधून काढत भाविकांना त्यांच्या मनोकामना पूर्ण होण्याचा कौल दिला.यावेळी झालेली अलोट गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी सायंकाळी दोन्ही पालख्यांचे गोवळकोट येथील मंदिराकडे प्रयाण झाले. मंगळवारी (दि. ३) गोवळकोट येथे होम लावून तेथील सहाणेवर विराजमान करण्यात आली. सायंकाळी दोन्ही पालख्या मिरवणुकीने मंदिरात नेऊन शिमगोत्सवाची सांगता झाली.

शेरणे म्हणजे कायमनात नवस बोलून शेरणे (सजवलेला नारळ) कोणाच्याही नकळत नदीकिनारी लपविला जातो. पालखी आणि निशाण तेथे फिरते. जेथे पालखी व निशाण जड लागले, तेथे उकरून पाहिले जाते. अशा ठिकाणी शेरणे सापडतात. ज्यांनी लपविलेले शेरणे पालखीला सापडते, त्यांचा नवस पूर्ण होतो, असे मानले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Karanjeshwari Devi finds 44 'Sherne'; Shimgotsav concludes with procession.

Web Summary : Karanjeshwari Devi found 44 hidden 'Sherne' at Chiplun's Shimgotsav, fulfilling devotees' wishes. The festival, marked by processions and unique traditions like the Masjid visit symbolizing Hindu-Muslim unity, concluded with a vibrant procession at Gowalkot after Devi Redjai visit.