शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात शिवसेना, धनुष्यबाणाचे नाते कधीच तुटू शकत नाही - नीलेश राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:43 IST

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आदेश

चिपळूण : कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण वेगळे नाते आहे, ते गावा-गावातून कधीच तुटू शकत नाही. गावातील लोकांना धनुष्यबाण माहीत आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माहीत आहेत. यामुळे लोकं स्वतःहून पक्षात येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकवून भेट द्यायची आहे, तेव्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहन मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी चिपळुणात केले.चिपळूण दौऱ्यादरम्यान शिंदेसेनेचे चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या कार्यालयात झालेल्या सत्काराप्रसंगी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहाेत. गेली दहा वर्षे आपल्या कपाळाला गुलाल लागला नव्हता. ते तुमच्यामुळे पक्षामुळे लागला, असे आपण आभार दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले हाेते. यामुळे पक्षाचे उपकार आयुष्यात कधीच विसरणार नाही, असे ते म्हणाले. चिपळूणमुळे आपल्याला ओळख मिळाली. ही ओळख गेली दहा वर्षे टिकवण्यामध्ये चिपळूणने मोठे सहकार्य केले, अशा शब्दांत आपली भावना व्यक्त केली.यावेळी तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, दिलीप चव्हाण, युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले, माजी नगरसेवक महम्मद फकीर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रश्मी गोखले उपस्थित होते.

कधीही हाक माराआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा. पक्ष मजबूत करा. आपण कडवट शिवसैनिक पदाधिकारी आहात. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी तुमचा भाऊ आहे. तुमच्या कुटुंबातील आहे. मी तुम्हाला आपल्या कुटुंबातील समजतो. मी तुमच्या कुटुंबातील आहे, असे समजून मला कधीही हाक मारा, मी तुमच्या पाठीशी १०० टक्के सदैव उभा असणार आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणNilesh Raneनिलेश राणे Shiv Senaशिवसेना