शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळलेल्या देवमाशाच्या पिल्लाच्या मृत्यूचे कारण आले समोर

By मनोज मुळ्ये | Updated: November 18, 2023 13:09 IST

गुरुवारी त्याचे शवविच्छेदन करून त्याला मालगुंड खाडीकिनारी दफन करण्यात आले

मनोज मुळ्येरत्नागिरी : चार महिन्यांचे पिल्लू आपल्या आईपासून दुरावले, त्यामुळे दुधाअभावी त्याची उपासमार झाली. कळपापासून लांब गेले, त्यामुळे त्याच्यावर मानसिक ताण आला आणि यातूनच त्याचा मृत्यू झाला. गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळलेल्या देवमाशाच्या पिलाचा शवविच्छेदन अहवाल वनखात्याला मिळाला असून, त्यात उपासमार आणि मानसिक ताण हेच कारण नमूद करण्यात आले आहे.देवमाशाच्या पिलाला सुखरूप समुद्रात सोडण्यासाठी शेकडो हात मदतीसाठी पुढे झाले. मात्र, त्यानंतरही त्या पिलाचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. गुरुवारी या पिलाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यातून उपासमार आणि मानसिक ताण ही दोन कारणे पुढे आली आहेत. वन खाते, महसूल खाते, मालगुंड आणि गणपतीपुळे ग्रामपंचायत, जीवरक्षक, पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, तसेच कर्मचारी, परगावाहून आलेले पर्यटक आणि असंख्य ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला.सोमवारी सकाळपासून मंगळवारी रात्रीपर्यंत या पिलाला वाचविण्यासाठी आणि खोल समुद्रात पाठविण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली. मंगळवारी रात्री ते पिल्लू खोल समुद्रात गेलेही. मात्र, बुधवारी ते परत आले. तेही मृतावस्थेत. गुरुवारी त्याचे शवविच्छेदन करून त्याला मालगुंड खाडीकिनारी दफन करण्यात आले.

आईचे दूध तीन वर्षेदेवमासा हा सस्तन मासा आहे. त्याची पिले तीन वर्षांची होईपर्यंत आईच्या दुधावरच जगतात. सगळेच मासे कळपाने राहतात. देवमासाही कळपानेच वावरतो. मात्र, आई आणि तिची पिल्ले कळपापासून थोडे वेगळे असतात. एखादे पिल्लू दगावले, तर त्याची आई शोकही व्यक्त करते. माणसांमध्ये आढळणाऱ्या भावना देवमाशातही मोठ्या प्रमाणात आढळतात.

आई करून देते शिकारदेवमाशाची पिल्ले तीन वर्षांची होईपर्यंत आईचे दूध पितात आणि त्याच वेळी त्यांची आई त्यांना छोट्या माशांची शिकार करून देते. कळपातच या माशांना छोट्या माशांच्या शिकारीचे प्रशिक्षणही मिळते. तीन वर्षांची झाल्यानंतर ही पिल्ले स्वत:च शिकार करून खातात.

माणसांपेक्षा अधिक संवेदनशीलता प्राण्यांमध्ये असते. ते आपल्या कार्यक्षेत्राबाहेर गेले किंवा आपल्या कळपाबाहेर गेले, तर सैरभैर होतात. त्यांच्यावर मानसिक ताण येतो. कधी कधी या मानसिक ताणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटकाही येतो. त्यात ते दगावण्याची भीती असते. त्यामुळे संकटात सापडलेल्या, कळपाबाहेर गेलेल्या प्राण्यांच्या मदतीसाठी अधिक वेगाने हालचाली केल्या जातात. - राजश्री कीर, परिक्षेत्र वनअधिकारी, चिपळूण. 

देवमासा अधिक वजनदार असतो. गणपतीपुळे किनाऱ्यावर आलेले पिल्लूच तीन ते साडेतीन टन वजनाचे हाेते. असे वजनदार मासे पाण्यात स्वत:चे वजन आरामात पेलतात. मात्र, जेव्हा ते किनाऱ्यावर येतात किंवा वाळूत अडकून राहतात, तेव्हा त्यांचे हे वजन त्यांच्याच जिवावर बेतू शकते. अशा वेळी त्यांचे फुप्फुस तुटून अंतर्गत रक्तस्राव होण्याची भीती अधिक असते. - प्रा.स्वप्नजा माेहिते, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी