शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम मंत्री आज पुन्हा करणार चिपळूण-आरवली महामार्गाची पाहणी

By संदीप बांद्रे | Updated: September 12, 2023 12:27 IST

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या युद्धपातळीवर सुरू

चिपळूण : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मंगळवारी दुपारी चिपळूणमध्ये येत असून, ते चिपळूण ते आरवली महामार्ग चौपदरीकरण कामाची पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर आरवली ते कांटे या येथील कामाचीही पाहणी करणार आहेत. गणेशोत्सवापूर्वी त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, पावसामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, चौपदरीकरणाची एक मार्गिका तरी डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने बांधकाम मंत्री चव्हाण यांनी या प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले असून, गेले वर्षभरात त्यांनी तब्बल ८ वेळा कोकण दौरा करून कामाची पाहणी केली.गणेशोत्सव काही दिवसावर आला आहे. या उत्सवासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर कोकणात येतात. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक वाढते. त्यामुळे रस्ता सुस्थितीत असणे आवश्यक असते. त्यामुळे पुन्हा ते महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी दाैरा करणार आहेत. सकाळी पनवेल येथून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. पळस्पे ते इंदापूर येथून कामाची पाहणी करण्यास ते सुरुवात करणार आहेत.कशेडी बोगदा तसेच परशुराम घाट येथे कामाची पाहणी केल्यानंतर दुपारी ते चिपळुणात दाखल होणार आहेत. याठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा करून चिपळूण ते आरवली या २५ किलोमीटरच्या कामाची पाहणी करणार आहेत. चिपळूण ते आरवलीपर्यंत महामार्गाची एक मार्गिका बहुतांश पूर्ण झाली असली, तरी सावर्डे वहाळ फाटा तसेच आरवली या ठिकाणी  अद्याप काॅंक्रिटीकरण बाकी आहे. तसेच रस्ता खड्डेमय झाला आहे. गणेशोत्सवापूर्वी त्याची किमान चांगली दुरुस्ती होणे आवश्यक आहे. चिपळूण ते आरवली मार्गाची पाहणी केल्यानंतर ते आरवली ते कांटे मार्गाची पाहणी करणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग