शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: हरचेरी, असोडे अन् बावनदी धरणातील गाळ उपशाचा प्रस्ताव चार वर्षे पडला खितपत

By अरुण आडिवरेकर | Updated: May 10, 2023 15:55 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिल्यानंतरच गाळ काढण्याच्या कामाला  सुरुवात होणार

रत्नागिरी : औद्योगिक विकास महामंडळाच्या हरचेरी, असोडे आणि बावनदी धरणातील गाळ उपसण्यासाठी सन २०१९मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगीचा प्रस्ताव दिला आहे. चार वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्यापर्यंत गाळ काढण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यावर्षीही धरणातील गाळ उपसा होण्याची शक्यता कमी आहे.औद्योगिक विकास महामंडळाने सन १९७० मध्ये हरचेरी येथे धरण बांधले. सुमारे २.९७ दलघमी पाणी साठवण क्षमता या धरणाची आहे. परंतु, गेल्या ५५ वर्षात एकदाही धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही. गाळामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. यासाठी सन २०१९ मध्ये औद्योगिक विकास महामंडळाने हरचेरीसह असोडे (लांजा), बावनदी धराणातील गाळ उपसण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयाकडे  परवानगी मागितली होती. परवानगीची फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल चार वर्ष धूळखात पडून आहे.हरचेरी धरणावरून मिरजोळे, उद्यमनगर, एमआयडीसीसह रत्नागिरी शहराचा वरचा भाग तसेच नऊ ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. तर बावनदी धराणातून जिंदलसह जयगड पंचक्रोशीतील गावांना पाणी पुरवठा केला जातो.सध्या हरचेरी धरणात ६ जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, जून महिन्यात पाऊस लांबणीवर पडल्यास एमआयडीसीला पाणीटंचाईची झळ बसते. यावर्षी एक दिवसाआड पाणी देण्याची वेळ एमआयडीसीवर आली आहे.  सद्यस्थितीत गाळ काढण्याचे काम होऊ शकते.परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी न दिल्याने गाळ काढण्याचे काम सुरू करणे शक्य नाही.  एमआयडीसीच्या हरचेरी धरणात काही लाख हजार क्युबिक मीटर गाळ आहे. तर बावनदी, असोडे धरणाचीही हिच स्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिल्यानंतरच गाळ काढण्याच्या कामाला  सुरुवात होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण