शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नीलिमा चव्हाणच्या आत्महत्येमागे स्टेट बँकेच्याच प्रोजेक्ट मॅनेजरचा दबाव; पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 11:23 IST

नीलिमा चव्हाण हिच्यावर बँकेतील एक कर्मचारी वारंवार कामासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता.

शिवाजी गोरे

दापोली : नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी स्टेट बँक ऑफ  दापोली शाखेच्या प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड यांना अटक झाली. हाती आलेल्या माहितीनुसार नीलिमा चव्हाण हिच्यावर बँकेतील एक कर्मचारी वारंवार कामासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. त्याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम सुदेश गायकवाड याच्या विरुद्ध नीलिमा चव्हाण हिला आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गायकवाड हा मूळचा कोडोली, पन्हाळा कोल्हापूर जिल्हयातील असून सध्या टीआरपी रत्नागिरी इथे वास्तव्यास आहे. फिर्यादीत सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी आपली मुलगी दापोली इथल्या ज्या बँकेत काम करत होती त्या ठिकाणी दैनंदिन कामाची माहिती संग्राम गायकवाड याला द्यावी लागत असल्याचं सांगितले आहे. तिच्या कामात नेहमी १५ दिवसांच टार्गेट पूर्ण करण्यासाठी तिला वारंवार सुट्टीवर असताना ही फोन येत असत असे सांगितले आहे. तसेच आपल्या मुलीला दिवसाला चार ते पाच डी mat  खाती उघडण्यासाठी गायकवाड जाणूनबुजून दबाव टाकत असल्याचं सुट्टीच्या दिवशी दरखेपेस नीलिमा आपल्याला व आपल्या भावाला सांगत असल्याचं नमूद केले आहे.

नोकरी सुरू झाल्यापासून गायकवाड नीलिमावर कामाच्या संदर्भात सातत्याने दबाव टाकत होता. तिला काम जमत नसल्याचं सांगत नोकरीवरून कमी करण्याची धमकी देखील देण्यात आली होती. यातूनच नीलिमाच्या मनावरील ताण वाढत होता. तसेच गेले काही दिवस ती घरात व्यवस्थित जेवत देखील नव्हती, असे या फिर्यादीत नमूद केलं आहे. 

दरम्यान, या प्रकरणी निलीमाचा मृत्यू ही आत्महत्या होती घातपात झाल्याचा कोणता पुरावा मिळाला नसल्याचे पोलिसांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तिच्या व्हीसेरा अहवालात देखील कोणत्याही प्रकारचे विष दिसून आलेले नाही, असे नमूद केलेले असून या संपूर्ण प्रकरणात गायकवाड याच्या अटकेमुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. तसेच २२ तारखेला होणारे आंदोलन होणार का याचीही चर्चा सुरू आहे.

टॅग्स :SBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया