शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

रत्नागिरीच्या ‘इंद्रधनू’चा पॅटर्न महाराष्ट्रात राबविणार : मंत्री उदय सामंत

By शोभना कांबळे | Updated: November 18, 2023 14:01 IST

महाराष्ट्रामधील रांगोळी कलाकारांना राज्यात व्यासपीठ मिळवून देणार

रत्नागिरी : रत्नागिरीच्या इंद्रधनु रांगोळी प्रदर्शन स्पर्धेचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवणार असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील दामले विद्यालयात सुरू असलेल्या इंद्रधनू रांगोळी प्रदर्शनातील कलाकारांच्या सत्काराप्रसंगी केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रामधील रांगोळी कलाकारांना राज्यात व्यासपीठ मिळवून देणार असल्याचेही सांगितले. हे प्रदर्शन २३ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांसाठी खुले आहे.दिवाळी सणाचे औचित्य साधून उदय सामंत फाउंडेशनतर्फे इंद्रधनु रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन दामले विद्यालय रत्नागिरी येथे केले आहे. यामध्ये सहभागी झालेल्या रांगोळी कलाकारांचा सन्मान मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. या रांगोळी प्रदर्शनाला रत्नागिरीकरांनी उत्तम प्रतिसाद दिला असून या कलाकारांच्या कलेला दाद दिली आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील आणि राज्यातील १९ दिग्गज रांगोळीकार यांनी सहभाग घेतला आहे. या सर्व रांगोळीकारांचा मंत्री उदय सामंत आणि मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. समाजोपयोगी काम उदय सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून केले जातेय याचा अभिमान असल्याचे सामंत म्हणाले.यावेळी ज्येष्ठ रांगोळीकार कृष्णा जाधव, प्रसन्न आंबुलकर, छायाचित्रकार प्रशांत राजीवले, सुनील उर्फ दादा वणजू, राजेश सोहोनी, उदय गोखले, राहुल कळबंटे, सिद्धेश वैद्य, नगरपालिकेचे मुख्यअधिकारी तुषार बाबर, शिवसेनेचे तसेच युवा सेनेचे पदाधिकारी, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदय सामंत फाउंडेशनचे महेश सामंत आणि त्यांचे सहकारी सिद्धेश वैद्य, रजनीश परब, प्रथमेश साळवी, पूर्वा पेठे, विद्या विचारे, मानसी साळुंखे, समीर इंदुलकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत