शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची उद्या पुन्हा मंत्र्यांकडून पाहणी

By मनोज मुळ्ये | Updated: September 5, 2023 22:05 IST

गणेशाेत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण करण्याचे आश्वासन

रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गाच्या चाैपदरीकरण कामांतर्गत गणेशाेत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण करण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. या आश्वासनानंतर त्यांनी वारंवार महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाहणी दाैरे आयाेजित केले. आता पुन्हा ते या महामार्गाच्या कामाची पाहणी करणार असून, बुधवार, ६ सप्टेंबर राेजी दाैरा करणार आहेत.महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन विराेधी पक्षांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यातच रखडलेले काम आणि महामार्गावर पावसाळ्यात पडलेले खड्डे यामुळे साेशल मीडियावरही खिल्ली उडविण्यात आली. ठेकेदार कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे रखडलेला हे काम चांगलेच चर्चेत राहिले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी पावले उचलली आहेत. पावसाळ्यातही हे काम सुरू ठेवून लवकरात लवकर महामार्ग पूर्णत्वाला नेण्याचे त्यांनी निर्देश दिले हाेते. त्यानंतर त्यांनी वारंवार या महामार्गाच्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला आहे.गणेशाेत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण करण्याची सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली हाेती. त्यानुसार महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ते बुधवारी पाहणी दाैरा करणार आहेत.बुधवार, ६ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० ते ३ वाजता पॅकेज ८ तळगाव ते वाकेड या ३५  किमीची पाहणी, दुपारी ३ ते ३:४५ वाजता पॅकेज ७ वाकेड ते कांटे ५१ किमी, दुपारी ३:४५ वाजता ते ४:३० वाजता पॅकेज ६ कांटे ते आरवली ४० किमी, दुपारी ४:३० वाजता ते सायंकाळी ५ वाजता पॅकेज ५ आरवली ते चिपळूण या २५ किमी, सायंकाळी ५ ते ५:३० वाजता चिपळूण ते परशुराम घाट ११.४० किमी, सायंकाळी ५:३० ते ६:३० वाजता पॅकेज ४ परशुराम घाट ते कशेडी घाट ४२.३० किमी, सायंकाळी ६:३० ते ७ वाजता पॅकेज ३ कशेडी घाट ते भोगाव खुर्द या १३ किमी रस्त्याच्या कामाची पाहणी करणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग