शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील मुख्य रस्त्याचे १०० कोटींतून होणार काँक्रिटीकरण

By शोभना कांबळे | Updated: December 6, 2023 16:31 IST

शहर आणि परिसरातील १२५ कोटींच्या विकासकामांना १७ रोजी प्रारंभ

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या रत्नागिरी शहरातील विकासकामांचा शुभारंभ येत्या १७ डिसेंबर रोजी नगरपालिका करणार आहे. यात प्रमुख १७ कामांचा समावेश आहे. यात नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचा समावेश असून, त्यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. अनेक कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.नगरोत्थान योजनेतून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ९६.९९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे, तसेच थिबा पॅलेस येथील थ्रीडी मॅपिंग मल्टी मीडिया शो (खुले नाट्यगृह) यासाठी २० काेटी आणि रत्नागिरीतील वि. दा. सावरकर नाट्यगृहाच्या कामालाही प्रारंभ झाला असून, त्यासाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.त्याचबरोबर नाट्यगृहाच्या पाठीमागील खाऊ गल्ली चांगल्या प्रकारे विकसित करण्यात येणार आहे, तसेच शहरातील जिजामाता उद्यानाचे सुशोभीकरण, तसेच उद्यानाशेजारील खाऊ गल्लीही विकसित होणार आहे. यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रत्नदुर्ग किल्ला येथे शिवसृष्टी विकसित करणे, तेलीआळी येथे उद्यान उभारणे, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची दुरुस्ती, तसेच मागील बाजूला असलेल्या भाजी मार्केट आणि मच्छीमार्केट इमारतीच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम आदी विकासकामे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून होणार आहेत.नगरोत्थान योजनेतून कोकण विभागातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नने सन्मानित असलेल्या मान्यवरांच्या प्रतिकृतींचे सुशोभीकरण, ध्यान केंद्राचे बांधकाम, तारांगणशेजारील शिर्के उद्यानाचे सुशोभीकरण, शहरात विठ्ठलमूर्ती उभारण्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम करणे, सभोवतालचा परिसर सुशोभीकरण करणे, ही कामे होणार आहेत.यापैकी तारांगण आणि विठ्ठलमूर्ती चबुतरा आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी जे जे स्कूल ऑफ आर्ट यांच्याकडे सव्वाकोटीचा निधी वर्ग करण्यात आल्याचे यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले. या सर्व कामांचा शुभारंभ येत्या १७ डिसेंबर राेजी करण्यात येणार आहे.

चिपळूण घरपट्टी कार्यवाहीला स्थगितीचिपळूण नगरपालिकेच्या हद्दीतील काही मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टी आकारणी केली जात आहे. याच्या विरोधात नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत माहिती देताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, घरपट्टी आकारणीवरून नागरिकांमध्ये गैरसमज झाला आहे. याबाबत बुधवारी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. जनतेच्या भावनांचा विचार करून घरपट्टी कार्यवाहीला स्थगिती देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूक