शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाकडाच्या खोपीमध्ये लपून बसला बिबट्या, ग्रामस्थांनी लावले पळवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:41 IST

रत्नागिरी तालुक्यातील भोके-मायंगडेवाडीतील भर वस्तीत बिबट्या शिरल्यामुळे एकच तारांबळ उडाली. लाकडाच्या खोपीमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला पळवून लावण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले हाेते.

रत्नागिरी : तालुक्यातील भोके-मायंगडेवाडीतील भर वस्तीत मंगळवारी (२२ मार्च) बिबट्या शिरल्यामुळे एकच तारांबळ उडाली. प्रेम मायंगडे यांच्या लाकडाच्या खोपीमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला पळवून लावण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले हाेते. एक तासाच्या प्रयत्नानंतर त्या बिबट्याला जंगलाकडे पळवून लावण्यात ग्रामस्थांना यश आले.भोके मायंगडेवाडीतील ग्रामस्थ रंगपंचमी खेळून घरी परतले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान बिबट्याच्या डरकाळ्याचा आवाज आला. मात्र, ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वस्तीच्या मध्यभागी लाकडे ठेवण्याच्या छोटीशा खोपीत (खोली) बिबट्या लपून बसला होता. डरकाळ्यांच्या आवाजाच्या दिशेने ग्रामस्थांनी शोध सुरु झाला.बॅटरीच्या उजेडात ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले. वस्तीत बिबट्या घुसल्याची माहिती गावात पसरताच संपूर्ण गाव बिबट्याला पाहण्यासाठी जमा झाला हाेता. अडचणीची जागा असल्यामुळे काहीच करता येत नव्हते, त्यातच काळाेखामुळे बिबट्या अंगावर उडी मारण्याचीही भीती हाेती.बिबट्याला पळवून लावण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न सुरु केले. अखेर सुमारे एक तासांनी हा बिबट्या एका ग्रामस्थाच्या अंगणाच्या दिशेने उड्या मारत पळून गेला. त्याच्या पाठून अवघा गाव धावला.

वस्तीत कधीच घुसला नव्हता

पंधरा दिवसांपूर्वी गावातील श्वान गायब होत होते. आजपर्यंत कधीच बिबट्या गावात शिरला नव्हता. पहिल्यांदाच गावात बिबट्या शिरल्याचे प्रेम मायंगडे यांनी सांगितले. या बिबट्याला माेबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रबद्द करण्यासाठी तरुणांची धावपळ उडाली हाेती. काळाेखामध्येही तरुण बिबट्याचे चित्रीकरण करत हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्या