शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

दिवसा घरी अन् रात्री निवारा केंद्रावर!, चिपळुणात कायमस्वरूपी स्थलांतराचा प्रश्न 

By संदीप बांद्रे | Updated: August 1, 2023 16:44 IST

प्रशासनासमोर तालुक्यातील १३ गावांमधील १२२३ लोकांच्या स्थलांतराचा प्रश्न

चिपळूण : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी - ठाकूरवाडी आदीवासी पाड्यावर डोंगर कोसळल्याची घटना घडल्यानंतर तालुक्यातील १३ गावांमधील १२२३ लोकांच्या स्थलांतराचा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यातील ७१ जणांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. काहीजण दिवसा घरी आणि रात्री जिल्हा परिषद शाळेत सुरू केलेल्या निवारा केंद्रावर वस्ती करीत आहेत. तीन गावामध्ये काही कुटुंब तात्पुरती स्थलांतरित झाली असली, तरी उर्वरित १० गावांमधील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.दरडीचा धोका असलेल्या १३ ग्रामपंचायत परिसरातील ३६ वाड्यांमधील ३४१ कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.येथील लोकांचे तात्पुरते पुर्नवसन होण्यासाठी ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा व काही समाज मंदिरांमध्ये २६ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. परंतु एक दोन गावांमध्येच स्थलांतरची प्रक्रिया सुरु झाली आहे. तालुक्यात ज्या-ज्या ठिकाणी संभाव्य धोका आहे अशा ठिकाणी जाऊन अधिकारी स्थानिकांना स्थलांतरित होण्यासाठी समजूत घालत आहेत. परंतु तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर होण्यास कोणीच तयार नसल्याचे देखील समोर येत आहे.चिपळूण मधील परशुराम घाटात दरडीचा धोका कायम आहे. येथे डोंगरावर परशुराम गाव, तर डोंगराच्या पायथ्याशी पेढे गाव वसलेले आहे. २०२१ साली अतिवृष्टीमुळे पेढे गावातील काही घरावर दरड कोसळली होती. त्यामध्ये तिघांचा मृत्यू देखील झाला होता. तालुक्यात अनेक ठिकाणी अशी धोकादायक परिस्थिती आहे. त्याचे सर्वेक्षण देखील प्रशासनाकडून करण्यात आले असून स्थानिकांना स्थलांतराच्या नोटिसा देखील देण्यात आले आहेत. पावसाळी काळात चार महिन्यासाठी स्थलांतरित करता यावे यासाठी २५ पथके देखील तैनात करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात १८, तर शहरी भागात ७ पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.तूर्तास तालुक्यातील २१ कुटुंबातील ७१ जणांचे स्थलांतर केले आहे. यामध्ये कादवड धनगर वाडीतील ८ कुटुंबांमधील १९ जणांपैकी ६ जण खेर्डी येथे नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. उर्वरित १३ जण गावच्या जिल्हा परिषद शाळेत केवळ रात्रीच्या वेळी वस्ती करतात आणि दिवसा घराकडे राहतात. कोळकेवाडी मधील १८ जणांपैकी १० जण नातेवाईकांकडे राहतात. तसेच येगाव सुतारवाडी व ठोकबावमधील १० कुटुंबातील ४२ जण जिल्हा परिषद शाळेत वास्तव्य करीत आहेत. उर्वरित १० गावांमधील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.

या गावातील ग्रामस्थांना नोटीस

पेढे कुभांरवाडी, परशुराम घाटमाथा, तिवरे येथील गावठाणवाडी, कातकरवाडी, भेंदफणसवाडी, भेंद-धनगरवाडी, कुंभारवाडी, गंगेचीवाडी. तिवडीतील राळेवाडी, उगवत वाडी, भटवाडी. रिक्टोली येथील इंदापुर वाडी, मावळतवाडी, गावठाणवाडी, मधलीवाडी, बौध्दवाडी, देऊळवाडी. नांदिवसे मधील राधानगर, स्वयंदेव, वाकरी धनगरवाडी, बावलाई धनगरवाडी. कादवड धनगरवाडी, ओवळी येथील काळकाई - धनगरवाडी, धामनदी - धनगरवाडी, बुरंबवणेवाडी, खेंड- धनगरवाडी. कळकवणे येथील रांगी धनगरवाडी, खलीफा धनगरवाडी. कोळकेवाडी मधील खारवार- धनगरवाडी, हसरेवाडी, जांभराई धनगरवाडी, कोळवणे धनगरवाडी, माच धनगरवाडी, बोलाडवाडी.  पिंपळी बुद्रुक, कुभार्ली येथील लांबेवाडी,  पेढांबेतील दाभाडी, रींगी धनगरवाडी. येगाव येथील ढोकबाव  सुतारवाडी. कळंबट गवळीवाडी आणि गोवळकोट बौद्दवाडी व मोहल्ला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलन