शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामांवर पडणार हातोडा, प्रशासनाने दिलेली मुदत संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:39 IST

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा बंदरातील शासनाच्या मालकीच्या जागेत उभारण्यात आलेली ३१९ अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत प्रशासनाने दिलेली मुदत गुरुवारपर्यंत देण्यात ...

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा बंदरातील शासनाच्या मालकीच्या जागेत उभारण्यात आलेली ३१९ अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत प्रशासनाने दिलेली मुदत गुरुवारपर्यंत देण्यात आली हाेती. ही मुदत संपल्याने शुक्रवारी तोडण्यात येणार आहेत. ही बांधकामे तोडण्यासाठी न्यायालयाकडून स्थगिती मिळू नये, यासाठी मत्स्य विभागाकडून न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले होते.गेल्या अनेक वर्षांपासून मिरकरवाडा बंदरातील जेटी परिसरामध्ये शासकीय जागेत ही बांधकामे उभारण्यात आली आहेत. यापूर्वीही मत्स्य विभागाकडून या बांधकामांवर हातोडा उगारण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा ती उभारण्यात आली. या बांधकामांमध्ये मासे मारण्याची जाळी, नौकांचे साहित्य, सुकी-ओली मासळी ठेवण्यात येते. ही बांधकामे अनधिकृत असल्याचा ठपका मत्स्य विभागाने ठेवला आहे. मिरकरवाडा बंदराचा दुसऱ्या टप्प्यात विकास करण्यात येत असल्याने ही अनधिकृत बांधकामे तोडण्यात येणार आहेत. त्यासाठी मत्स्य विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे.दरम्यान, ही अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी मत्स्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईला मच्छिमारांनी विरोध केला आहे. या कारवाईमुळे अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त हाेणार असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. मात्र, या विरोधाला न जुमानता प्रशासनाने बांधकामे हटविण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने शुक्रवारी ही बांधकामे पाडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.मंत्री नितेश राणे यांनीही घेतला होता आढावामत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामांबाबत आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी या परिसरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कारवाईला गती मिळाली आहे.साहित्य ठेवण्यासाठी पर्यायी जागेची मागणीअनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार, या भीतीने अनेकांनी तेथील साहित्य अन्यत्र हलविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मासेमारीसाठी आवश्यक असलेले साहित्य कुठे ठेवणार? साहित्य ठेवण्यासाठी पर्यायी जागा द्यावी, अशी मागणीही मच्छिमारांकडून होत आहे.

अनधिकृत बांधकामांची यादीबांधकामे  - संख्याकावन  - १४१पत्राशेड  -  ८०पक्की बांधकामे - ३१पानटपरी -  ३३अर्धपक्के बांधकाम - १२भेळ गाडी/वडापाव स्टॉल - ११चहानाष्टा सेंटर - ०४मोबाइल दुकान - ०५सलून  - ०१मंदिर  - ०१२३ जानेवारीपर्यंत स्वखर्चाने बांधकामे हटविण्यासाठी मुदत होती

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी