शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम घाटात काँक्रीटीकरणाला तडे, मातीचा भरावही खचतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 11:52 IST

घाटातील प्रवास काहीसा धोकादायक बनला

चिपळूण : मुसळधार पावसात सोमवारी (३ जुलै) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात नव्याने करण्यात आलेल्या काँक्रीटीकरणाला तडे गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. घाटात काँक्रीटीकरणाच्या खालील मातीचा भरावही खचत असल्याने महामार्गाला तडे गेले आहेत. परिणामी घाटातील प्रवास काहीसा धोकादायक बनला आहे. खचलेल्या रस्त्याचा वाहतुकीला कोणताही धोका नसून, पावसाळ्यानंतर खचलेल्या भागात नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग महाड विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.परशुराम घाट सुमारे ५.४० किलोमीटर लांबीचा आहे. घाटातील काँक्रीटीकरणाची एक मार्गिका पूर्णत्वाला गेली आहे. घाटातील लांबीपैकी १.२० किलोमीटर लांबी ही उंच डोंगररांगा व खोल दऱ्या असल्याने डोंगर कटाईनंतर या भागात गेल्या आठवडाभरापासून दगड, माती अधूनमधून कोसळत आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणीही केली होती. त्यातच सोमवारी घाटातील काँक्रीटीकरणाला तडे गेल्याचे समोर आले आहे. घाटात शंभर मीटरचे काँक्रीटीकरण नुकतेच करण्यात आले होते. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीला खुला करण्यात आला. आता याच मार्गावर काँक्रीटीकरणाला तडे गेले आहेत.घाटात रस्त्याला तडे गेल्यानंतर पेढे सरपंच आरुषी शिंदे, उपसरपंच अष्टविनायक टेरवकर, ग्रामविकास अधिकारी नारायण कटरे, ग्रामस्थ बबन पडवेकर, बंटी शिंदे आदींनी या भागाची पाहणी केली. घाटात चौपदरीकरण करणाऱ्या कल्याण टोलवेज कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही या भागाची पाहणी केली. महामार्गाला तडे गेले तरी वाहतुकीला त्याचा धोका नाही. पावसाळ्यानंतर या भागात नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूक