शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ४८ तासांनी सापडला अश्विनीचा मृतदेह, नीलेशचा शोध सुरूच; दाम्पत्याने वाशिष्ठी नदीत घेतली होती उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 17:19 IST

एनडीआरएफ पथक, पोलिस व अहिरे यांचे नातेवाईक घेत आहेत शोध

चिपळूण : वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दाम्पत्यामधील अश्विनी अहिरे हिचा मृतदेह तब्बल ४८ तासांच्या शोधमोहिमेनंतर हाती लागला आहे. शुक्रवारी सकाळी करंबवणे खाडीत धामणदिवीनजीक हा मृतदेह सापडला. मात्र, अश्विनीचा पती नीलेश अहिरे याचा मात्र अजूनही कोणताच ठावठिकाणा न लागल्याने त्याचा शोध सुरूच आहे. पोलिसांनी चारही बाजूने तपास सुरू ठेवला आहे.शहरातील गांधारेश्वर येथील वाशिष्ठी पुलावरून नवदाम्पत्याने नदीत उडी घेतल्याचा प्रकार ३० जुलै रोजी घडला होता. तेव्हापासून एनडीआरएफ पथक, पोलिस व अहिरे यांचे नातेवाईक या दोघांचा शोध घेत आहेत. या शोधमोहिमेत तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी धामणदिवी येथे खाडीकिनारी अश्विनी अहिरे यांचा मृतदेह सापडला. कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.अश्विनी व नीलेश अहिरे यांच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण अहिरे कुटुंब हादरून गेले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर साक्री धुळे येथून अनेक नातेवाईक चिपळुणात दाखल झाले असून, तेही शोधमोहिमेत सहभागी झाले होते. नीलेशचा शोध लागेपर्यंत ही मोहीम सुरूच ठेवली जाणार असून, त्यासाठी नातेवाईकांनीही स्वतंत्र बोटीची व्यवस्था केली आहे. अश्विनी व नीलेश यांनी आत्महत्येचा निर्णय का घेतला, याविषयी अद्याप उलगडा झालेला नाही. पोलिस यंत्रणा या घटनेचा चारही बाजूने तपास व चौकशी करीत आहे.