शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

पक्षी सप्ताह विशेष: नीलिमा पक्ष्याची एकाच जागी दुसऱ्या वर्षी वीण!, यंदाचा हंगाम राहिला २६ दिवसांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:23 IST

तो भारत, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया या देशात घनदाट झाडी आणि जंगलातही आढळतो

चिपळूण : नीलिमा (Tickell’s Blue Flycatcher) पक्ष्याने पावसाळ्यातील आपल्या विणीच्या यंदाच्या नव्या हंगामासाठी सलग दुसऱ्या वर्षी खेंड (ता. चिपळूण) धीरज वाटेकर यांच्या परसदारातील हॉलच्या खिडकीच्या डाव्या कोपऱ्यावर विश्वास दाखवला होता.जवळपास पक्षी घरटं बांधताना छद्मवेश (camouflage) धारण करत असतात. अर्थात स्वतःचे खरे स्वरूप लपवत असतात. यावर्षीच्या घराच्या खिडकीत सलग दुसऱ्यांदा नीलिमाचं घरटं बांधून पूर्ण होईपर्यंत या घरट्याबाबत काेणाच्या लक्षात आलं नव्हतं. टिकेल्स ब्लू फ्लायकॅचर हा फ्लायकॅचर कुटुंबातील चिमणीच्या आकाराचा एक छोटासा पक्षी. जेमतेम ६ इंच/१५ सेंमी. लांब आकाराचा असावा. याचे मराठी नाव ‘नीलिमा’ असे आहे. हा पक्षी कीटकभक्षक प्रजाती आहे. तो भारत, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया या देशात घनदाट झाडी आणि जंगलातही आढळतो.परसदारी यावर्षी पक्ष्याने २६ जून राेजी पहिले अंडे दिल्यावर सलग दोन दिवसात आणखी दोन अंडी दिली. त्यानंतर चौथे अंडे ३० तारखेला दिले. ९ जूनला तीन अंड्यातून तीन पिल्लांनी जन्म घेतला. गेल्यावर्षी नीलिमाने चार पिल्ले दिलेली, यंदा मात्र अंडी चार घातलेली असताना पिल्ले मात्र तीनच जन्मली. एकेक करून २० जूनला तीनही पिल्ले घरट्यातून उडाली.

विणीचा हंगाम २६ दिवसांचागतवर्षी २०२४ मध्ये २३ जूनला पहिले अंडे दिले होते. त्याच ठिकाणच्या नव्याने बांधलेल्या घरट्यात मादीने यावर्षी २६ मे राेजी अंडे दिले. नीलिमा पक्ष्याने गतवर्षी १७ जुलैला तर यंदा २० जूनला आपला विणीचा हंगाम पूर्ण केला. या पक्ष्याचा गतवर्षीचा विणीचा हंगाम २५ दिवसांचा होता. यंदाचा हंगाम २६ दिवसांचा राहिला.

खेंडीतील वास्तव्यात मागील १६ वर्षांत विविध छोट्या पक्ष्यांना आपल्या हक्काचा अधिवास-आधार वाटावा असे नैसर्गिक वातावरण निर्माण करण्यात आपण यशस्वी होत असल्याचे ही घटना सांगत होती. आपल्या परसदारावर, इथल्या निसर्गावर आणि आजूबाजूच्या साऱ्या परिसरावर विणीच्या हंगामासाठी पक्ष्यांनी पसंतीची मोहाेर उमटवली होती. - धीरज वाटेकर, पर्यटन अभ्यासक, चिपळूण

English
हिंदी सारांश
Web Title : Tickell's Blue Flycatcher returns to same spot for nesting.

Web Summary : Tickell's Blue Flycatcher nested in the same spot for the second year. The bird laid four eggs, hatching three chicks. The nesting period lasted 26 days, slightly longer than last year. This highlights successful habitat creation.