शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

व्हेल माशाचे पिल्लू अखेर समुद्रात सोडले, पण...; शेकडो हातांनी केले शर्थीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 07:48 IST

तीनही वेळा तो बाहेर आला.

- संजय रामाणी

गणपतीपुळे (रत्नागिरी) : ते पाच-सहा महिन्याचे एक पिल्लू होते. पण ते देवमाशाचे (ब्ल्यू व्हेल) पिल्लू असल्याने तीस फूट लांब आणि सुमारे साडेतीन टन एवढे त्याचे वजन होते. पाच ते सहा महिन्यांचे हे पिल्लू सोमवारी सकाळी गणपतीपुळे किनाऱ्यावर आले. शेकडो हातांनी तब्बल ४२ तास प्रयत्न करून त्याला जिवंत ठेवले. ओहोटीच्यावेळी त्याच्यावर पाणी फवारण्यात आले, आठ तास सलाइन लावण्यात आले आणि ४२ तासांनी ते सुखरूप खोल समुद्रात पोहोचलेही...पण सायंकाळी किनाऱ्यावर ते मृतावस्थेत दिसून आले. एखाद्या वाइल्ड लाइफ चॅनेलवरची कथा वाटावी, अशी ही घटना रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे घडली.

तीन वेळा बाहेर...अनेक सरकारी यंत्रणा, अनेक ग्रामस्थ, खासगी कंपन्या, पर्यटक असे शेकडो हात या मोहिमेत नि:स्वार्थ भावनेने सहभागी झाले. प्रथम एमटीडीसीचे कर्मचारी व स्थानिक प्रशासनाने त्याला समुद्रात खोलवर नेऊन सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मासा पुन्हा समुद्रकिनारी लागत होता. ही बातमी पसरताच किनाऱ्यावर नागरिकांंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. वाळूत अडकलेल्या माशाला सोमवारी तीनवेळा समुद्रात ढकलण्यात आले. मात्र, तीनही वेळा तो बाहेर आला.

आणि तो देवाघरी गेला...मंगळवारी पुणे येथून आलेल्या रेस्क्यू टीमने तसेच वनविभागाने माशावर वेळीच योग्य उपचार केल्याने तो जगू शकला. रात्री ११:३० वाजता जिंदल कंपनीचे जहाज (टग) व तटरक्षक दलाच्या बोटीने या माशाला खोल समुद्रात व्यवस्थित व सुखरूप सोडण्यात आले. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनची चर्चा समाजमाध्यमांवर दिवसभर सुरू होती. मात्र, संध्याकाळी सहाच्या सुमारास वाईट बातमी आली, हा मासा पुन्हा मृतावस्थेत किनाऱ्यावर आला.  

यांनी केले प्रयत्नवनविभाग, ग्रामपंचायत गणपतीपुळे, स्थानिक पोलिस प्रशासन, तटरक्षक दल, मत्स्य विभाग, महसूल विभाग, एमटीडीसी गणपतीपुळे, बोट क्लब गणपतीपुळे, जिंदल कंपनी, वाइल्ड लाइफ पुणे रेस्क्यू टीम तसेच असंख्य स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी बचाव मोहीमेत सहभाग घेतला. 

ओहोटीच्या वेळी पाण्याचा मारासायंकाळी भरतीची वेळ नसल्याने या माशाला जिवंत ठेवण्यासाठी त्याला पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने एमटीडीसी कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीचे जीवरक्षक यांनी समुद्राच्या पाण्याचा मारा करून त्याला जिवंत ठेवले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी