शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

बलात्कार करुन अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्याला फाशी, खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा 

By मनोज मुळ्ये | Updated: May 3, 2023 18:42 IST

पोलिसांच्या चौकशी अंती सूर्यकांतने गुन्ह्याची कबुली दिली व मृतदेह कुठे लपवला आहे याची माहिती दिली.

खेड : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करत मृतदेह लपवणाऱ्या आरोपी तरुणाला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एल. निकम यांनी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. सूर्यकांत एकनाथ चव्हाण असे या आरोपीचे नाव असून, बुधवार दि. ३ रोजी न्यायाधिशांनी ही शिक्षा सुनावली आहे.खेड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी दि. १९ जुलै २०१८ रोजी शाळेतून घरी परत येत असताना अचानक बेपत्ता झाली. खूप शोधाशोध केल्यानंतरही ती न सापडल्याने तिच्या वडिलांनी खेड पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.दि. २० जुलै रोजी या अल्पवयीन मुलीचा केसांना बांधावयाचा पट्टा गावातील एका इसमाच्या घराजवळ काही ग्रामस्थांना दिसला. त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल गंभीर व सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी आरोपी सूर्यकांत नवनाथ चव्हाण (वय २९) याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशी अंती सूर्यकांतने गुन्ह्याची कबुली दिली व मृतदेह कुठे लपवला आहे याची माहिती दिली.खेड पोलिसांनी सूर्यकांतला अटक करून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०२, ३७६ (आय), ३६३, ३६४, २०१, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दखल केला.

या खटल्यात तब्बल २८ साक्षीदार तपासण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे, कर्मचारी सूरज माने, राम नागुलवार यांनी या प्रकरणी सहकार्य केले. सरकारी वकील ॲड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सूर्यकांतला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग १ डी. एल. निकम यांनी मरेपर्यंत फाशी व आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ऐकण्यासाठी खेड न्यायालयाच्या आवारात शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

न्याय मिळाल्याने वकिली जीवन सार्थअल्पवयीन बालकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाना कठोर संदेश देणारा निर्णय आहे. जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासात सुमारे ४५ वर्षांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खेड न्यायालयाची नवीन इमारत झाल्यापासून अशा प्रकारचा निकाल पहिल्यांदाच आला आहे. हा न्याय मिळाला असल्याने वकिली जीवन सार्थकी लागल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालय