शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिने लोटले तरीही अद्याप राजापुरात गंगामाई प्रवाहीत, मात्र भाविकांनी गंगामाईकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 17:06 IST

गत वर्षी देशभरात कोराना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना राजापुरातील उन्हाळे येथील गंगामाईचे ३० एपिल रोजी आगमन झाले होते.

राजापूर : गत वर्षी देशभरात कोराना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना राजापुरातील उन्हाळे येथील गंगामाईचे ३० एपिल रोजी आगमन झाले होते. त्यानंतर दहा महिने लोटले तरीही अद्याप प्रवाहीत आहे. मात्र भाविकांनी गंगामाईकडे पाठ फिरविल्याचे सध्याचे चित्र आहे.

गंगा क्षेत्रातील चौदाही कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून काशिकुंड तुडूंब भरल्याने गोमुखातून अखंड पाण्याचा स्त्रोत  सुरू  आहे. मात्र काही कुंडातील पाण्यावर शेवाळी आलेली दिसून येत आहे.सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी गंगा प्रकट होते. जवळपास तीन महिन्याच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते असा पघात आहे. मात्र अलिकडच्या कालावधीत तिच्या या आगमन व निर्गमनच्या सर्वसाधारण नियमित कालखंडाला छेद गेला आहे. हे सन २०१३ पासून चालू झाले आहे. काही वर्षे तर सलग आली होती. तर, काही वर्षापूर्वी तिच्या वास्तव्याचा कालावधीही खुपच लांबला होता.

यावेळी १ वर्ष १४ दिवसांनी गंगामाईचे आगमन झाले होते. अद्यापही गंगा क्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने भरली आहेत. मात्र मुळ गंगा, गायमुख व गायमुखा जवळील कुंड वगळता सर्व कुंडाच्या पाण्यावर शेवाळी पसरली आहे. सर्वात मोठे असणारे काशिपुंड पूर्ण भरलेले असून गोमुखातून पाणी वाहत आहे. मुळ गंगेचा प्रवाहही अद्याप चांगल्या स्वरूपात वाहत आहे.गतवर्षी ३० एपिल २०२१ ला गंगामाईचे आगमन झाले. गंगामाईचे आगमन झाल्यापासून १० महिने झाले तरी येथील सर्वच कुंडातील पाणी अद्यापही प्रवाहीत आहे. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे यापुर्वी स्थानिक प्रशासनाकडुन गंगाक्षेत्रावर भाविकांना जाण्यास मनाई आदेश बजावण्यात आला होता. त्यामुळे गंगा आगमनानंतर या ठिकाणी होणारी भाविकांची गर्दी, दुकानांची रेलचेल आणि त्याद्वारे होणारी लाखोंची आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती.

सद्यस्थितीत मुळगंगेसह चंद्रकुंड, सुर्यकुंड, नर्मदाकुंड, गोदावरी कुंड, चंद्रभागा कुंड, बाणकुंड, सरस्वती कुंड, कावेरीकुंड, भिमाकुंडामध्ये पाणी असून काशीकुंडातील पाणी गोमुखातून वाहत आहे. तर मुळ गंगाही अद्याप प्रवाहीत आहे.कोरोनाच्या संसर्गानंतर गंगाक्षेत्राला देखील चांगलाच फटका बसला आहे. गंगेच्या आजवरच्या इतिहासात एवढा परीणाम झाला नव्हता. गंगेच्या आगमन व अंतर्धान पावण्याच्या क्रियेत बदल झाल्यामुळे या स्थानावरील अर्थव्यवस्थेवर प्रथम परिणाम झाला होताच. मात्र कोरोना काळात तर येथील अर्थव्यवस्था थांबल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुर