शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Tauktae Cyclone: घराचे पत्रे कोसळून नातवावर पडणार, तितक्यात...; देवदूत ठरलेल्या आजोबांनी सांगितला थरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 13:25 IST

Tauktae Cyclone: आजोबांचं प्रसंगावधान अन् नातवाला जीवदान; नातवाला वाचवताना आजोबांच्या पाठीला दुखापत

रत्नागिरी: तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण पट्ट्यात मोठं नुकसान झालं आहे. गेल्या वर्षी निसर्ग आणि आता तोक्तेमुळे कोकणात कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. तोक्ते वादळानं काल कोकणाला झोडपून काढलं. हे वादळ रत्नागिरी तालुक्यातील कर्ले गावातील कलंबटे कुटुंबीयांसाठी जीवघेणं ठरणार होतं. मात्र कुटुंबातील आजोबांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे नातवाचा जीव वाचला. नातवाला वाचवताना आजोबा अशोक कलंबटे यांच्या पाठीला दुखापत झाली. मात्र नातू वाचल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे.अमृता फडणवीसांचा 'तुफान' शायरीतून सवाल, रुपाली चाकणकरांचा जवाबतोक्ते चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संकटातून नातवाचे वाचलेले प्राण या संपूर्ण प्रसंग ७० वर्षीय आजोबा अशोक कलंबटे यांच्या डोळ्यासमोर आहे.  'संध्याकाळी पाच वाजताची वेळ होती. वारा जोरात होता. आम्ही सर्व घरातच होतो. पावसामुळे बाहेर जाणं आम्ही टाळलं. माझा पाच वर्षाचा नातू वेदांत खेळत होता. काही वेळाने मी देवासमोर दिवा लावण्यासाठी देवघरात गेलो. तोच बाहेरुन धडाम असा आवाज आला. घरासमोरील मोठं झाड आमच्या घरावर पडलं होतं. घराचे पत्रे फुटत होते. माझे डोळे वेदांतला शोधत होते. तोच वेदांत मला दिसला.' नातवावर कोसळलेलं संकट आजोबा सांगत होते. तौक्ते चक्रीवादळाचा वानखेडे स्टेडियमला तडाखा, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला खतरा, पाहा PIC'वरुन पत्रे कोसळत होते. वेदांत पत्रे कोसळत असलेल्या खोलीकडे जात होता. मी त्याला क्षणाचाही विलंब न लावता मागे खेचलं आणि त्याला पोटाखाली धरलं. माझ्या पाठीवर पत्रे पडले. मला मार लागला. पण माझा नातू सुखरुप असल्याचं समाधान होतं. जर मी माझ्या नातवाला खेचलं नसतं तर कोण जाणे काय झालं असतं. आम्हाला या प्रसंगाची कल्पना देखील करवत नाही,' हे सांगताना आजोबांचे डोळे अश्रूंनी भरले होते.थरारक Video! आतापर्यंत समुद्रात अडकलेल्य़ा 177 कर्मचाऱ्यांची सुटका; इतरांचा शोध सुरु'चक्रीवादळामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सारा संसार वादळाने हिरावला. आता आम्ही शेजाऱ्यांकडे राहत आहोत. लाखोंचा खर्च आता आम्हाला करायला लागणार आहे. पण, समाधान एकच आमचा नातून सुखरुप आहे,' असं कलंबटे यांनी सांगितलं. कालचा थरारक प्रसंग सांगताना आजोबांचा कंठ दाटून आला, डोळे पाणावले. वादळामुळे झालेलं नुकसान मोठं आहे. मात्र नातू वाचल्याचं समाधान त्याहून कितीतरी पटीनं अधिक असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.पाच वर्षांच्या वेदांतनंदेखील काल झालेला प्रसंग जशाच्या तसा सांगितला. 'मी देवाच्या खोलीत जात होतो. धडाम आवाज आला. मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर झाड घरावर कोसळलं होतं. वरुन घराचे पत्रेदेखील कोसळत होते. तेवढ्यात आजोबांनी मला जोराने ओढत आपल्या पोटाखाली घेतलं. आजोबांच्या पाठीला लागलं. आजीच्या डोक्याला टाके पडले आणि माझ्या हाताला थोडा मार लागला,' असं सांगताना वेदांत आजोबांना जाऊन बिलगला.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ