शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

हवामान अन् राजकारणाने कासव महोत्सव बिघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:33 IST

कासव महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशा आल्याने पर्यटक नाराज झाले आहेत. दिनांक ८ मार्चपासून वेळास येथे कासव महोत्सवाला सुरूवात झाली. मात्र, १० मार्चपर्यंत एकही कासवाचे पिल्लू घरट्यांमधून बाहेर न आल्याने कासव महोत्सवासाठी आलेले पर्यटक नाराज झाले आहेत.

ठळक मुद्देहवामान अन् राजकारणाने कासव महोत्सव बिघडलाकासव महोत्सवासाठी आलेले पर्यटक नाराज

मंडणगड : कासव महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशा आल्याने पर्यटक नाराज झाले आहेत. दिनांक ८ मार्चपासून वेळास येथे कासव महोत्सवाला सुरूवात झाली. मात्र, १० मार्चपर्यंत एकही कासवाचे पिल्लू घरट्यांमधून बाहेर न आल्याने कासव महोत्सवासाठी आलेले पर्यटक नाराज झाले आहेत.बदलत्या हवामानामुळे नियमित कालावधीमध्ये पिल्लं बाहेर आली नसल्याचे कारण वन विभाग सांगत असला तरी कासव संवर्धनामधील ही मोठी कमतरता म्हणावी लागणार आहे. गेल्या १० ते १२ वर्षांपासून वेळास येथे आलिव्ह रिडले या दुर्मीळ कासवांच्या घरट्यांचे संरक्षण केले जात आहे. यावर्षी १३ घरट्यांमधील १५०० अंड्यांचे संरक्षण करण्यात आल्याने त्यातून १५०० पिल्ले बाहेर पडणार आहेत. त्यासाठी दिनांक ८ मार्च ते ६ एप्रिल असा कालावधी निश्चित धरण्यात आला आहे.यापैकी पहिल्या घरट्यामधून ८ मार्च रोजी कासवांची पिल्ले बाहेर येणार होती. मात्र, तीन दिवस उशिरा म्हणजे सोमवारी ११ मार्च रोजी केवळ ८ पिल्ले बाहेर आली. दरवर्षी कासव महोत्सवाची तारीख देण्याआधी सुरूवातीला एक ते दोन घरट्यांमधून पिल्लं बाहेर आल्याची खात्री केली जाते. त्यानंतरच उर्वरित घरट्यांमधूून पिल्लं बाहेर येण्याचे अनुमान लावले जात होते. यावर्षी मात्र असे न करता प्रत्यक्ष कासव महोत्सवाची तारीख जाहीर करण्यात आली. त्यामुळे वेळास येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक ७ तारखेपासूनच दाखल झाले होते. मात्र, दिनांक १० मार्चपर्यंत एकही कासवाचे पिल्लू वाळूमधून बाहेर न आल्याने पर्यटक नाराज झाले आहेत.यावर्षी कासव महोत्सवाबरोबरच रॉक क्लायबिंग, झिप लाईन, स्लॅक लाईन, व्हॅली क्रॉसिंग, रायफल शुुटिंग, बरमा ब्रिज, आर्चरी, सुमो फाईट यासारख्या उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. त्याची प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी कासव महोत्सवासाठी मुंबई, पुणेसह संपूर्ण राज्यातून मोठ्या आशेने पर्यटक वेळासमध्ये दाखल झाले होते. मात्र, हवामानातील बदलामुळे ना कासवे पाहायला मिळाली व गावातील अंतर्गत वादामुळे अ‍ॅडव्हेंचर गेमही खेळता आले नाहीत. यावर्षी प्रथमच टर्टल टुरिझम सोसायटी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग यांच्यामार्फत या कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :wildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरी