शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत धावल्या १५ दिवसात टॅँकरच्या ७०० फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:35 IST

रत्नागिरी शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून १५ प्रभागांमध्ये गेल्या १ जूनपासून टॅँकरच्या ७००पेक्षा अधिक फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे टॅँकर मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत धावल्या १५ दिवसात टॅँकरच्या ७०० फेऱ्यामुख्य जलवाहिनीद्वारे होणारी पाणीगळती पूर्णपणे थांबणार

रत्नागिरी : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून १५ प्रभागांमध्ये गेल्या १ जूनपासून टॅँकरच्या ७००पेक्षा अधिक फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे टॅँकर मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे.शहरातील नळपाणी योजना जुनाट झाल्याने ऐन पावसाळ्यातही पाणीटंचाईची समस्या गेली पाच वर्षे निर्माण होत आहे. या समस्येमुळे भर पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. रत्नागिरी शहरासाठी शासनाने मंजूर केलेल्या ६३ कोटी खर्चाच्या सुधारित नळपाणी योजनेचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने पाणी पुरवठ्याला लागलेले ग्रहण सुटणार आहे.यंदा रत्नागिरी शहरातील खासगी विहिरीही एप्रिलअखेर व मे महिन्याच्या सुरुवातीलाच आटल्या. रडतखडत सुरू असलेल्या रत्नागिरीच्या नळपाणी योजनेला अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.मे महिन्यात टॅँकरचेच पाणीशहरवासियांना मे महिन्यात दररोज टॅँकरच्या ५५ फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे मे महिन्यात रत्नागिरी नगर परिषदेकडून शहरातील १५ प्रभागात नागरिकांना तब्बल साडेसोळाशे फेऱ्यांमार्फत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. यावेळी पावसाळ्यातही टॅँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागणार आहे.मुख्य जलवाहिनीचे काम सुरुरत्नागिरी शहराच्या सुधारित नळपाणी योजनेच्या शीळ ते साळवी स्टॉप येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतच्या मुख्य जलवाहिनीच्या उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. साळवी स्टॉप ते शीळमधील पाटीलवाडीपर्यंत जलवाहिनी उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यापुढील जॅकवेलपर्यंतचे ५०० मीटरमधील जलवाहिनी उभारणीचे काम बाकी आहे.जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर या नवीन जलवाहिनीतून साळवी स्टॉप जलशुध्दीकरण केंद्रामध्ये शीळचे पाणी आणले जाणार आहे. त्यामुळे आता मुख्य जलवाहिनीद्वारे होणारी पाणीगळती पूर्णपणे थांबणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRatnagiriरत्नागिरी