शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत शिवराय, शंभूराजे, पंढरपूरच्या विठोबा यांचे उंच पुतळे उभारण्यात येणार

By शोभना कांबळे | Updated: September 2, 2023 18:48 IST

रत्नागिरी : रत्नदूर्ग (भगवती) किल्ला येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम सुरू झालेले आहे. यात शिवाजी महाराज यांचा २४ ...

रत्नागिरी : रत्नदूर्ग (भगवती) किल्ला येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम सुरू झालेले आहे. यात शिवाजी महाराज यांचा २४ फुटी उभा पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच थिबा पॅलेस येथे संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर आषाढी आणि कार्तिकीला रत्नागिरी जिल्ह्यातून ढरपूरला भक्त जातात, त्यामुळे पंढरपूरच्या विठोबाची सर्वाधिक उंच मुर्तीही रत्नागिरी शहरात उभारण्यात येणार आहे. तसेच संसारे गार्डनमध्ये ध्यान केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिली.पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी रत्नदूर्ग (भगवती) किल्ला येथे भेट देऊन उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी केली व आढावा घेतला. तसेच संसारे गार्डन येथे आठ कोटी खर्चातून उभारण्यात येणाऱ्या ध्यान केंद्राच्या ठिकाणाचीही पाहणी केली. याबाबत तात्काळ आराखडा तयार करुन लवकरात लवकर निविदा प्रक्रीया पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती, त्यांनी दिली. संभाजीराजे यांचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुतळा तयार झाला आहे. तो थिबा पॅलेस येथे उभा रहातोय, त्याचे प्रेझेंटेशन देण्यात आले आहे. तसेच पंढरपूरच्या विठोबाची देखील महाराष्ट्रातील सर्वात उंच मुर्ती रत्नागिरी शहरात होतेय, त्याचीदेखील जागा निश्चित झाली आहे. पैसे देखील वर्ग केले आहेत. या सगळ्या गोष्टी पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.मार्लेश्वर, भाट्ये याठिकाणी प्रत्येकी पाच कोटी रूपये खर्च करून या पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. पर्यटकांचीही चांगली सोय करणार आहोत, असेही सामंत यांनी सांगितले.रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे खड्डे पडले आहेत. तेही दुरूस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणसोबतही बैठक झाली. गणपतीच्या आधी पूर्ण कोकणातील एक लेन सुरू होईल, अशा दृष्टीने सार्वजनिक बांधकाम काम करतेय, त्याचाही आढावा घेतला असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतtourismपर्यटन