शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

पाठिंब्यासाठी नारायण राणे यांच्याशी चर्चा, सुनील तटकरे यांची रत्नागिरीत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 20:44 IST

राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना शेकाप, मनसेचा पाठिंबा आहे. स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांच्याशी माझे व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे पाठिंबा देण्याबाबत बोलणे झाले आहे.

रत्नागिरी : राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना शेकाप, मनसेचा पाठिंबा आहे. स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांच्याशी माझे व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे पाठिंबा देण्याबाबत बोलणे झाले आहे. कणकवलीत आम्ही एकत्र निवडणूक लढलो आहोत. राणे हे मोठे नेते आहेत. ते त्यांची भूमिका जाहीर करतील, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेसबरोबर जागावाटपाबाबत गुरुवारी सायंकाळी चर्चा होणार असल्याचे तटकरे म्हणाले.यापुढील कोणत्याही निवडणुकीत भाजपशी युती करणार नाही. सर्व निवडणुका स्वबळावर लढवू, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी विधान परिषदेसाठी पुन्हा युती केली आहे. शिवसेना नेत्यांची ही धरसोड वृत्ती नेहमीचीच आहे. यांच्यावर विश्वास कोण ठेवणार, असा टोला त्यांनी लगावला. रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या मतदारसंघात तीनही जिल्ह्यात मिळून ९४१ मतदार आहेत. त्यातील ४६३ हा जादुई आकडा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पार करून विजयी होणारच असा दावा तटकरे यांनी केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्री असूनही अनंत गीते यांनी गेल्या चार वर्षांच्या काळात कोकणकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. कोकणात रासायनिक प्रकल्प नको ही भूमिका आम्ही आधीच घेतली होती. अवजड उद्योग खाते मिळाल्यानंतर जिल्ह्यात चांगले प्रकल्प येतील, ही अपेक्षा होती. मात्र गेल्या चार वर्षात एकही प्रकल्प गीतेंकडून जिल्ह्यात येऊ शकला नाही, अशी टीका तटकरे यांनी केली.