शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तळीरामांचा घसा कोरडाच - परवानगी नाकारल्याने दुकाने बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 16:24 IST

रत्नागिरी : ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांसाठी सोमवारपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. या शिथिलतेमध्ये ...

ठळक मुद्दे - दुकानाबाहेर रांगा लावलेल्यांची निराशा- पुन्हा करावी लागणार प्रतीक्षा

रत्नागिरी : ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांसाठी सोमवारपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. या शिथिलतेमध्ये वाईन शॉप सुरू होणार असल्याची बातमी रविवारीच सर्वत्र पोहोचली होती. त्यामुळे सकाळपासून रत्नागिरीतील वाईन शॉपसमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तळीराम उभे होते. मात्र, उत्पादन शुल्क विभागाने दुकाने सुरू करण्याबाबत कोणतीच परवानगी न दिल्याने अखेर तळीरामांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांद्वारे ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यात सर्व दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ही दुकाने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून वाईन शॉपही सुरू होणार असा मेसेज सर्वत्र फिरत होता. रविवारी सायंकाळी हा मेसेज सर्वत्र फिरल्यानंतर सोमवारी तळीरामांच्या प्रतीक्षेचा बांध फुटला आणि गेले दीड महिना प्रतीक्षेत असलेल्या तळीरामांनी रत्नागिरीतील दुकानांसमोर सकाळी ८ वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या.दुपारपर्यंत वाईन शॉप सुरू न झाल्याने तळीरामांची चुळबुळ सुरू झाली. यासंदर्भात कोणती माहिती आली आहे का, याची चाचपणी सुरू झाली. काही दुकान मालकांनी राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयात जाऊन विचारणाही केली. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर आयुक्तांनी दुकाने सुरू करण्याबाबत कोणतेच आदेश दिले नसल्याचे पुढे आले. त्यामुळे रत्नागिरीतील दुकाने बंदच ठेवण्यात आली होती.अखेर सकाळपासून रांगेत उभे राहून मद्याची प्रतीक्षा करणाऱ्या तळीरामांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. गेल्या दीड महिन्यापासून प्रतीक्षेत असणाऱ्या तळीरामांना पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरी