शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

देवरूखमधील स्वीटमार्टच्या खाद्यपदार्थात किडी, स्वीट मार्टवर हल्लाबोल, मालकाला प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 17:20 IST

देवरूख शहरातील द्वारका स्वीट मार्टमधील खाद्यपदार्थांमध्ये किडी असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. देवरूखातील नागरिकांनी या स्वीट मार्टवर हल्लाबोल करत मालकाला चांगलाच प्रसाद दिला.

ठळक मुद्देदेवरूखमधील स्वीटमार्टच्या खाद्यपदार्थात किडीस्वीट मार्टवर हल्लाबोल, मालकाला प्रसाद

देवरूख : शहरातील द्वारका स्वीट मार्टमधील खाद्यपदार्थांमध्ये किडी असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. देवरूखातील नागरिकांनी या स्वीट मार्टवर हल्लाबोल करत मालकाला चांगलाच प्रसाद दिला.देवरूख नगरपंचायतीने याची गांभीर्याने दखल घेत  पाहणी केली. त्यानंतर खाद्यपदार्थ बनविणे व विक्री करण्याचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.या दुकानात एक ग्राहक समोसा खात असताना या समोशामध्ये झुरळसदृश कीटक सापडला. ही बाब देवरूखमधील एका माजी नगरसेवकासह अन्य जागरूक नागरिकांना समजताच त्यांनी या दुकानावर धडक मारली. दुकान मालकावर प्रश्नांची सरबत्ती करत या नागरिकांनी एकच हल्लाबोल चढवला. त्याचप्रमाणे दुकानात व भटारखान्यात अस्वच्छता दिसल्याने नागरिक संतप्त झाले.द्वारका स्वीट या दुकानाची पाहणी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, मुख्याधिकारी बालाजी लोंढे, आरोग्य सभापती प्रेरणा पुसाळकर, नगरसेविका रेश्मा किर्वे, स्वीकृत नगरसेवक कुंदन कुलकर्णी यांसह सत्ताधारी नगरसेवक यांनी केली. त्याचबरोबर शहरातील जय अंबे स्वीट मार्टवरही याचप्रमाणे कारवाई करून पदार्थ बनवणे व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग