शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोड फसवणूक... रत्नागिरी हापूस सांगून कर्नाटक हापूस ग्राहकांच्या माथी

By मेहरून नाकाडे | Updated: April 17, 2023 20:17 IST

नैसर्गिक मधूर स्वाद व अविट गोडीमुळे हापूसला वाढती मागणी आहे.

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : नैसर्गिक बदलामुळे यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन खालावले आहे. स्थानिक हापूस बाजारात कमी असताना, पर्यटक, मुंबईकरांकडून हापूसला वाढती मागणी आहे. त्यामुळे काही विक्रेते रत्नागिरी हापूस सांगत चक्क ग्राहकांच्या माथी कर्नाटक हापूस मारत आहेत. ग्राहकांना फसवणूक झाल्याचे ऊशिरा लक्षात येत आहे.

नैसर्गिक मधूर स्वाद व अविट गोडीमुळे हापूसला वाढती मागणी आहे. रत्नागिरीतील हापूस कर्नाटकात लागवड करण्यात आल्याने रत्नागिरी हापूसच्या हंगामातच हा हापूस तयार होऊन बाजारात येतो. रंग, आकार, सुगंध यामुळे ग्राहक गोंधळतात. सध्या रत्नागिरी हापूस ८०० ते १००० रूपये डझन दराने विकण्यात येत आहे. तर कर्नाटक हापूस ५५० ते ६५० रूपये डझन दराने विकला जात आहे. मात्र कर्नाटक हापूस असा न भासविता चक्क रत्नागिरी हापूस सांगत विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना सुरूवातीला दर रत्नागिरी हापूसचे सांगितले जातात. ग्राहक व विक्रेता यांच्यात दरावरून घासघीस सुरू होते. दर कमी करून हापूस पाहिजे तेवढा बाॅक्समध्ये पॅकींग केला जातो. ग्राहकांना दर कमी केल्याचा आनंद वेगळाच असतो. मात्र आपली हापूसमध्ये फसगत झाली असल्याचे आंबा खाल्यानंतरच लक्षात येत आहे.

हापूसची मांडणी अशी केली जाते की रत्नागिरी व कर्नाटक हापूस सहजासहजी ओळखताच येत नाही.रत्नागिरी हापूसची वैशिष्टये१) हा हापूस आकाराने गोलाकार असतो

२) साल पातळ असते३) देठाकडे पिवळसर तर टोकाकडे हिरवट असतो

३) पिकल्यानंतर दोन ते तीन दिवसातच काळे डाग पडू लागतात.कर्नाटक हापूसची वैशिष्टये१) हा हापूस उभट असतो

२) साल जाड असते३) देठाकडे केशरी, लाल रंग तर खाली पिवळसर असतो

४) चार पाच दिवस टिकतोदरात कमालीचा फरक असल्याने ग्राहकांची हापूस नावे फसगत होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा